Instagram friendship job lure assaulting girl by giving her Googie pills nagpur sakal
नागपूर

Nagpur Crime : इन्स्टाग्रामवरील मैत्रीणीला गुगींचे औषध देऊन अत्याचार; मानकापुरातील घटना

nagpur latest news | आरोपी फरार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; मानकापूर पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इन्स्टाग्रामवरून मैत्री करीत, २१ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवित गुंगीचे औषध दाखवून २६ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहिन अशफाक अहमद शेख (रा. लष्करीबाग मशिद, तहसील) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी मोहिन अशफाक याने २१ वर्षीय युवतीची इन्स्टाग्रामवरून माहिती घेतली. यावेळी तिला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून त्याने तिच्याशी मैत्री केली.

याशिवाय त्याने तिच्याशी कॉलवर बोलणे करीत, त्याच्या मेडिसिन इंडिया मार्टवरून विदेशात मेडिसिन एक्सपोर्ट करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. दरम्यान त्याने तिला स्वतःच्या कंपनीत २० ते ३० हजार रुपयांची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तिला ग्राहकांशी बोलून कुठलीही डील पक्की करावी लागेल असे सांगितले.

दरम्यान सप्टेंबर २०२३ मध्ये तो तिच्या घरी व्यवसायाच्या कामाने भेटण्यासाठी जात होता. दरम्यान त्याच्या फोनवरून काम सुरू झाले. त्यानंतर त्याने फोन घेऊन देत, त्याचे पैसे कामातून कट करण्याचे सांगितले. २५ डिसेंबरला मानकापूर परिसरात त्याने बाहेरून जेवण आणण्याच्या नावाखाली त्यात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला. याची चित्रफित तयार करून त्याने ती व्‍हायरल करण्याची धमकी दिली.

याशिवाय कुणालाही न सांगण्यास सांगितले. त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. मात्र, त्यानंतर तिने स्वतःचे काम सुरू केल्यावर त्याला नकार दिल्याने तो सातत्याने युवतीला त्रास देऊ लागला.

तो फोन करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. दरम्यान त्याने लग्नाचेही आमिष दाखविले. याशिवाय त्यावेळी त्याने जेवणात गुंगीचे औषध टाकून भावाला बेहोश करीत अत्याचार केला. यावेळी त्याने पैसे, दागिने आणि मोबाइल घेत, त्यातून तिचे व्हिडीओ व्हायरल करीत बदनामी केली. याबाबत मानकापूर पोलिसांना तक्रार केली असता, त्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मोहिन अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT