International Book of Records  sakal
नागपूर

International Book of Records : चार वर्षीय युवेनला शंभर देशांची माहिती मुखपाठ

तंत्रज्ञान अन्‌ तंत्रज्ञानाच्या या युगात आपण अकराच्या पुढील पाढे म्हणू शकत नाही. आप्तांचा मोबाईल क्रमांक शोधण्यासाठी आपण मोबाईलची मदत घेतो. इतकी आपली स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तंत्रज्ञान अन्‌ तंत्रज्ञानाच्या या युगात आपण अकराच्या पुढील पाढे म्हणू शकत नाही. आप्तांचा मोबाईल क्रमांक शोधण्यासाठी आपण मोबाईलची मदत घेतो. इतकी आपली स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. मग, या युगात केवळ राष्ट्रध्वज पाहत शंभर देशांची नावे, त्यांच्या राजधान्या पाच मिनिटांमध्ये कोणी ओळखू शकेल, यावर आपला विश्‍वास बसेल का. पण होय, ही बाब खरी आहे. नागपूरकर युवेन डाऊ याने ही किमया साध्य केली ती वयाच्या चवथ्या वर्षी. त्याच्या या अद्‍भूत कौशल्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

युवेन हा शास्त्रीनगर येथील रहिवासी. त्याचे आई-वडील सायली व केतन दोघेही अभियंता असून सध्या कॅनडा येथील टोरंटोमध्ये ते नोकरी निमित्त वास्तव्यास आहे. युवेन तीन वर्षांचा झाल्यानंतर तो काही देशांचे राष्ट्रध्वज पाहून त्या देशांचे नावे ओळखू शकतो, ही बाब सायली व केतन यांच्या लक्षात आली. त्या दिवसापासून खेळासोबत अभ्यास म्हणून दररोज विविध देशांचे राष्ट्रध्वज युवेनला दाखविणे पालकांनी सुरू केले.

दररोज केवळ एक खेळ म्हणून एक ते दीड तास याचा सराव सुरू असायचा. अकरा महिन्यानंतर युवेन शंभरपेक्षा जास्त देशांची नावे राजधानीसकट ओळखू लागला. तीन वर्षे अकरा महिन्यांचा झाल्यानंतर आई-वडिलांना हा विक्रम करू शकतो, याची खात्री झाली. पाच एप्रिल रोजी त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. युवेनने पाच मिनिटे ४३ सेकंदात शंभर देशांची आणि त्यांच्या राजधान्यांची नावे ओळखून दाखविली आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या जागतिक विक्रमाची नोंद झाली. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डतर्फे या विक्रमाची नोंद घेण्यात आली असून युवेनला नुकतेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT