Investigation of political leaders who helped Archana for mining project suspected of involvement in conspiracy Sakal
नागपूर

Nagpur News : अर्चनाला मदत करणाऱ्या नेत्यांची चौकशी,‘मायनिंग प्रकल्प’साठी केली मदत; कटात सहभागी असल्याची शंका

पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी उंटखान्यातील जमिनीत मुलगी योगितालाही वाटेकरी केल्याने त्यांचा राग होता.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : गडचिरोली जिल्ह्यात नगररचना विभागात साहाय्यक संचालक असताना अर्चना पुट्टेवार यांचे अनेक भूमाफियांशी संख्य होते. यापैकी दोन भूमाफिया राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांच्या माध्यमातून गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्प मिळविण्यासाठी अर्चना पुट्टेवार प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांची पोलिस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

अर्चना पुट्टेवार यांचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन भूमाफियांशी चांगले संबंध होते. त्यात देसाईगंज वडसा येथील मोटवानी तर दुसरा अहेरी येथील कुख्यात भूमाफिया मुक्कावार याचा समावेश होता. या दोघांशी असलेल्या संबंधाच्या माध्यमातून एकीकडे सासऱ्याचा काटा काढणे तर गडचिरोली येथे कोळसा खाण मिळविण्यासाठी अर्चना आणि प्रशांत प्रयत्नरत होते.

त्यामुळे अर्चना यांनी त्यांना अनेकदा फायदा करून देत, अनेक जमिनीचे व्यवहार केले होते. हे करीत असताना, त्यांना त्यांच्याच जमिनीचा वाटा मिळत नव्हता. पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी उंटखान्यातील जमिनीत मुलगी योगितालाही वाटेकरी केल्याने त्यांचा राग होता. याशिवाय त्याबाबत न्यायालयात खटलाही दाखल होता. त्यामुळेच भूमाफियांच्या मदतीने सासऱ्याचा गेम करण्याचे ठरले. त्यासाठी सचिन, नीरज आणि सार्थकसह त्याचा साथीदाराची निवड करण्यात आल्याची माहिती आहे.

सार्थकचा दोनदा परवाना रद्द

सार्थकला बार काढण्यासाठी परवाना हवा होता. त्यासाठी त्याने दोनदा अर्ज केला होता. मात्र, तो रद्द झाला. त्यामुळे एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनी त्याला बारचा परवाना मिळून देण्याचे आमिष दाखवित बहिणीच्या सासऱ्याचा काटा काढण्याच्या कटात सहभागी करून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT