accident sakal
नागपूर

Nagpur: इसासनी-हिंगणा रस्ता मृत्यू मार्ग होतोय का ? ३५ अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू

लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी या मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एकूण ३५ अपघात झाले असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News: लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी या मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एकूण ३५ अपघात झाले असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या भागातील रहिवाशांनी याचिकाकत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत सहा आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

जितेंद्र मेश्राम, सतिश कन्हेरकर, देवेंद्र दायरे आणि मंगेश लोखंडे, असे रहिवासी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, लता मंगेशकर रुग्णालयासमोरील(Latest Marathi News)

इसासनी - हिंगणा रस्त्याचे रुंदीकरण नियमानुसार केले जात नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे न हटवता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ १५ मीटर रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे, रस्त्यावरील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इसासनी मार्गावरील नियमित वाहतूक आणि रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे रुग्णवाहिकेला लता मंगेशकर

रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे, इसासनी व हिंगणा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी व अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करावे, अशा मागण्यांचे निवेदन याचिकाकत्यांनी प्रशासनाला दिले होते. याचिकाकर्त्याने गेल्या दहा वर्षात (२०१३ ते २०२३) या मार्गावर झालेल्या अपघाता विषयीची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागविली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT