nagpur sakal
नागपूर

प्रचार कोण करणार, पैसा कोण लावणार? : राष्ट्रवादी कार्यकर्ते अस्वस्थ

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नेता मिळत नसल्याने सर्वच उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.

राजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेत्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नेता मिळत नसल्याने सर्वच उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे प्रचार कोण करणार?, पैसा कोण लावणार? निवडणुकीची मोर्चेबांधणी कोण करणार? असे प्रश्न उमेदवारांना छळत आहेत.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार उमेदवार रिंगणात आहेत. त्यातही दोन उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यात एक बंडखोर उमेदवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात आहे. देशमुखांनी उमेदवारी देताना विश्वासात घेतले नसल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. काटोलमध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार पराभूत झाल्यास मोठी बातमी होईल आणि पक्षात अधिकच अस्वस्थता निर्माण होईल, अशी भीतीही राष्ट्रवादीला सतावत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्यावतीने बंडखोरांची समजूत घालण्यासाठी अद्याप कोणीच पुढाकार घेतला नाही. सर्व त्यांचे ऐकेल तसा नेताही सध्या नागपूर जिल्ह्यात नाही.

अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ते मतदारसंघात नाहीत. हिंगण्याचे माजी आमदार रमेश बंग अस्वास्थामुळे फारसे सक्रिय नाहीत. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल मध्यंतरी नागपूर जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले होते. देशमुख-पटेल जोडीने फिरत होते. पक्षाच्या विस्तारासाठी अनेक मेळावे या जोडीने घेतले. मात्र, देशमुखांच्या अडचणी वाढल्यानंतर पटेलसुद्धा दिसेनासे झाले आहेत. जिल्ह्यात कोणीच लक्ष देत नसल्याने मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे यांना बोलावण्यात आले होते. त्यांनाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. त्यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडणार नाही, प्रदेशातून नियमितपणे पक्ष कार्याचा आढावा घेण्यासाठी एक नेता पाठविला जाईल, असे आश्वासन दिले होते.

उमेदवारांना आत्मनिर्भर व्हावे लागणार!

राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भात आढावा घेतल्याचे समजते. एकूणच नेत्यांचा प्रतिसाद बघता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आता स्वबळावर व स्वतःच्या ताकदीवरच लढावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

MJP Chief Engineer Arrested : कंत्राटदाराकडून 30,000 हजार घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता भुजबळ एसीबीच्या जाळ्यात; नागपुरात खळबळ

खरं बोललो तर मी अडचणीत येईल, माझ्यात हिंमत नाही; राम मंदिर देणगी चोरीवर बृजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया

Whatsapp Redesign : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉट्सॲपचे धमाकेदार अपडेट! एक टॅपवर सर्व ऑप्शन, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Abhijit Deepke : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अभिजित दीपकेची अमेरिकेत झाली बैठक, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT