नागपूर

सत्ताधाऱ्यांना आपल्याच सदस्यांची धास्ती; सभेत स्फोट होण्याची भीती

नीलेश डोये

नागपूर : निधी कमी मिळण्यासोबतच कामे होत नसल्याने सत्ताधारी पक्षातील सदस्यांमध्ये नाराजी आहे. शिवाय पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर काही सदस्य असमाधानी आहेत. त्यामुळे २० तारखेच्या सर्वसाधारण सभेत याचा स्फोट होण्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. हे टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (२० ऑगस्ट) ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांच्या कक्षात बैठक झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीला सर्व सभापतींसह काही प्रमुख सदस्य उपस्थित होते. काही महिन्यांपासून सत्ताधारी पक्षातील काही सदस्य पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज आहेत. नुकत्याच एक घटनेवरून त्यांच्यातील गटबाजी उघडपणे समोर आली. विरोध पक्षातील काही सदस्यांना झुकते माप देण्यात येत आहे. त्यांनाच विविध योजनेत अधिक निधी देण्यात येत आहे तर सत्ताधारी सदस्यांना कमी मिळत आहे. दलित वस्ती निधी वाटपात असाच प्रकार झाल्याचे सांगण्यात येते.

जनसुविधा, नागरी सुविधा निधी वाटपावरही सदस्यांमध्ये नाराजी आहे. निधी वाटपात समानता नसल्याचा मुद्दा स्थायी समितीतही गाजला होता. पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर असलेल्या नाराजीचा ‘ब्लास्ट’ सर्वसाधारण सभेत होण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. हे टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून सावधगिरीचे पावले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. नुकतेच जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा समोर आला. या प्रकरणात खुद्द मंत्री सुनील केदार यांनी लक्ष घातले असताना सारवासारव होत असल्याची चर्चा आहे.

विरोधकांमध्ये फूट!

एकमत नसल्याने अडचण होणार असल्याचे लक्षात येताच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये फूट पाडून त्यांच्यातील काही सदस्यांना हाताशी धरल्याचे चर्चा आहे. त्यामुळे सभा फारशी गाजणार नसल्याचेही सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT