file photo
file photo 
नागपूर

शेतकऱ्यांशी थट्टा... कर्जाच्या रकमेपेक्षा बॅंकेत जमा झाली कमी रक्कम

नीलेश डोये

नागपूर  ः डोक्‍यावरील कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली. दोन लाखापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परंतु सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थकबाकीच्या रकमेपेक्षा कमी रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली होती. या योजनेनुसार दीड लाख रुपये सरकार देणार असून त्यावरील रक्कम शेतकऱ्यांना द्यायची होती. वरील रक्कम भरल्यावर दीड लाख रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार होते. शेतकऱ्यांना रांगेत लावण्यात आले असून ही योजना फसवी असल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाआघाडीची सत्ता आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची योजना आणली. दोन लाखापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी कर्जदारांची नावे बॅंकेकडून घेवून

पात्र शेतकऱ्यांची यादी काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. आधार प्रामाणिक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम वळता करण्यात शेत आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णम जमा करण्यात आली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्जापेक्षा कमी रक्कम आल्याने एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अश्‍विनी मो. घाडगे असे शेतकऱ्याचे नाव आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यातील मौजा उबगी येथे शेती आहे. 
त्यांनी बॅंक ऑफ इंडिया, कळमेश्‍वर शाखेतून जून 2016 ला 50 हजारांचे कर्ज घेतले होते. 30 सप्टेंबर 2019 रोजी त्यांची थकित रक्‍कम 67 हजार 711 रुपये होती. तशी माहितीही सरकारला देण्यात आली. आधार प्रामाणिकर झाल्यावर प्रत्यक्षात 57 हजार रुपयेच खात्यात जमा झाले.

थकित कर्जाच्या रकमेच्या पेक्षा जवळपास 10 हजार रुपये कमी जमा झाले. सरकारकडून पैसा कमी देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. माफीची अंमबजावणी होण्यास विलंब होत असल्याने निश्‍चित मुदतीनंतर व्याजाची रक्कम न आकारण्याच्या सूचना सराकरने बॅंकांना केल्यात. परंतु बॅंकांकडून व्याजाची आकारणी होत आहे. माफीच्या रकमेनंतर संबंधित शेतकऱ्यावर 15 हजार रुपये थकबाकी दाखविण्यात येत आहे. जी की 10 हजार रुपये पाहिजे होती. शेतकऱ्यांने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT