jobs Recruitment Sakal
नागपूर

आशादायक: जुलै तिमाहीत सर्वाधिक नोकऱ्या; ६३ टक्के कंपन्यांत नोकरभरती

नोकर भरती : ६३ टक्के कंपन्यांनी आणखी कर्मचारी घेण्याचे दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुढील तीन महिन्यांत सुमारे ६३ टक्के कंपन्या आणखी कर्मचारी भरती करण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे ही तिसरी तिमाही नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने अधिक आशादायक असेल, असा निष्कर्ष मॅनपॉवरग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे.

जुलै-सप्टेंबर या २०२२च्या तिसऱ्या तिमाहीत नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक ५१ टक्के राहील, हा आठ वर्षातील उच्चांक असेल,असे या अहवालात म्हटले आहे. नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक एकूण रोजगार वाढण्याची अपेक्षा करणार्‍या कंपन्यांच्या टक्केवारीतून रोजगार कमी होण्याची अपेक्षा करणाऱ्यांची टक्केवारी वजा करून काढला जातो. जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी, ६३ टक्के कंपन्यांनी कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची तर १२ टक्के कंपन्यांनी त्यात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. २४ टक्के कंपन्यांनी कोणत्याही बदलाची शक्यता वर्तवलेली नाही. त्यामुळे नेट एम्प्लॉयमेंट आउटलुक ५१ टक्के आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता, भरती करण्याची कंपन्यांची मानसिकता ४६ टक्क्यांनी सुधारली आहे. एप्रिल-जून कालावधीच्या तुलनेत त्यात १३ टक्के वाढ झाली आहे. आपल्या देशात डिजिटायझेशन, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञान सक्षम सेवांची वाढती गरज आणि जगभरात भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रातील नोकरभरती सर्वाधिक राहील. तसेच देशाच्या पूर्व पश्चिम, दक्षिण -उत्तर सर्व विभागात भरतीचा आलेख उंचावणारा राहील, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

आशिया पॅसिफिक प्रदेशात, सर्वाधिक भरती होण्याचा अंदाज असलेल्या देशांमध्ये ५१ टक्के निर्देशांकासह भारत आघाडीवर असून त्यानंतर सिंगापूर ४० टक्क्यांसह दुसऱ्या आणि ३८ टक्क्यांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. तैवान ,जपान आणि हाँगकाँगमध्ये सर्वात कमकुवत निर्देशांक नोंदवले गेले. पात्र उमेदवार निवडताना सर्जनशीलता, मूळ संकल्पना, बारकाईने विचार करण्याची आणि विश्लेषण क्षमता, तर्कशुद्ध कारणमीमांसा करून समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्व, सामाजिक प्रभाव आणि पुढाकार घेण्याची तयारी अशा कौशल्यांचा अभाव उमेदवारांमध्ये जाणवत असल्याने अडचणी येतात, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

क्षेत्रनिहाय निर्देशांक

  • माहिती तंत्रज्ञान - ६८ टक्के

  • बँकिंग, वित्त, विमा, रिअल इस्टेट -६० टक्के

  • इतर सेवा - ५२ टक्के

  • रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स- ४८ टक्के

  • उत्पादन - ४८ टक्के

  • वाढती महागाई आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेली अस्थिरता अशा परिस्थितीतही नोकर भरतीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.

- संदीप गुलाटी, व्यवस्थापकीय संचालक, मॅनपॉवर ग्रुप इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT