नागपूर

नागपूर : कळमना बाजारात शेतकऱ्यांचीच कोंडी; माल फेकण्याची वेळ

राजेश प्रायकर

नागपूर : राज्य सरकारने दुकाने, शॉपिंग मॉल, दारूची दुकानेही दहा वाजेपर्यंत सुरू केली. परंतु, शेतकऱ्यांसाठी असलेल्या कळमना बाजार अद्यापही १२ वाजेपर्यंतच सुरू असल्याने शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीशिवायच परत जावे लागत आहे. विक्रीसाठी आणलेला माल पुन्हा परत घेऊन जाण्याचे भाडे परवडत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्यांवर शेतमाल फेकून देण्याची वेळ आली आहे. किंबहुना कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

कोरोनामुळे शहरातील इतर बाजारपेठांप्रमाणे कळमना बाजारही बंद करण्यात आला होता. त्यानंतर ब्रेक द चेनअंतर्गत राज्य सरकारने टप्प्या-टप्प्याने दुकाने उघडली. आता मागील आठवड्यापासून तर शहरातील सर्व बाजारपेठा, दुकाने, दारूची दुकाने, शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यात आले. राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कृषी खरेदी विक्रीही नेहमीप्रमाणे सुरू करण्याची मुभा दिली. परंतु, राज्य सरकारच्या आदेशाची कळमना येथील कृषी बाजार समितीवर कुठलाही परिणाम दिसून येत नाही.

अद्यापही कळमना बाजार दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू आहे. त्या तुलनेत कॉटन मार्केट येथील बाजार तीन ते चार वाजेपर्यंत सुरू असून खरेदी-विक्री होत असल्याचे येथील व्यापारी शेख हुसेन यांनी सांगितले. कळमना बाजारात सकाळी मोठ्या प्रमाणात इतर राज्यासह जिल्ह्यातील गावागावांतून शेतकरी भाजीपाल व इतर शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत.

परंतु, इतर राज्यातून येणारे भाजीपाल्याचे ट्रक खाली करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विक्रीची वेळ येईस्तोवर बारा वाजत असून त्यांच्यासाठी मार्केट बंद झाल्याचा फतवा काढण्यात येत आहे. एकीकडे भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाजीपाल्याला योग्य भाव नाही. त्यातच कळमना बाजारात भाजीपाला विक्रीवर नियंत्रण आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यांच्यावर शेतमाल फेकून देण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांमध्ये नैराश्य

भाजीपाला विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना मजुरीची खर्च, वाहनाचे भाडे असा मोठा खर्च लागत आहे. १२ वाजता कळमना मार्केट बंद होत असल्याने त्यांंना माल परत नेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहात नाही. परंतु, परत माल घेऊन जाणे परवडत नसल्याने शेतकरी माल फेकून देत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळेच १२ वाजेपर्यंत?

कोविडमुळे कळमना भाजी बाजाराची वेळ सुरुवातील सकाळी नऊ वाजेपर्यंत करण्यात आली होती. आता ती बारा वाजेपर्यंत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनीच दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

भाजीबाजार १२ वाजता बंद होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विकता येत नाही. शेतकऱ्यांना माल परत नेणे परवडत नाही. त्यामुळे भाजीबाजाराची वेळ चार वाजेपर्यंत केल्याने शेतकऱ्यांना माल विकून दोन पैसे घरी नेता येईल. अन्यथा फेकून द्यावा लागेल.
- राजकुमार साठवणे, शेतकरी, लिंगा, ता. कळमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT