Kalmana police arrest two-wheeler thief
Kalmana police arrest two-wheeler thief 
नागपूर

‘मास्टर माइंड’ दुचाकीचोरटा अटकेत, घरासमोरून उडवायचा बाईक 

अनिल कांबळे

नागपूर  : दुचाकी चोरण्यात ‘मास्टर’ असलेल्या कुख्यात चोरट्याला कळमना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या. आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. योगेश पौनिकर असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण परदेशी शाहू (वय २८, धरमनगर, कळमना, नागपूर) हे १७ ऑक्टोबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास (एमएच ४९ / बीजे ७७४८) बाईकने कामावरून घरी आले. त्यांनी दुचाकी घराच्या समोर लॉक करून ठेवली व रात्रीला झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही. चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कळमना परिसरात पॅट्रोलिंग करीत असताना आरोपी योगेश अनिल पौनिकर (वय १९, न्यू रामभूमी ले-आऊट, धरमनगर, कळमना) एमएच ४९/ बीजे ७७४८ क्रमांकाच्या बाईकसह आढळला.

त्याची चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली (एमएच ४९/ एसी २६१४) क्रमांकाची एक दुचाकी जप्त केली. पोलिसांनी त्याच्याजवळून दोन्ही वाहने जप्त केली. हा चोरटा दुचाकी चोरण्यात मास्टर असल्याची माहिती आहे. 

ही कारवाई पोलीस उपायुक्त निलोत्पल, सहायक पोलीस आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड, पोलीस हवालदार किशोर देवांगण, रामेश्वर कोहळे, नायक पोलीस शिपाई मनिष बुरडे, पोलिस शिपाई मनोज बहुरूपी, मनिश झरकर, अशोक तायडे यांनी पार पाडली.

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT