farmhouse 
नागपूर

फॉर्महाऊसवर ‘तो’ मित्रांसोबत मौजमस्ती करायला गेला आणि तिथेच घडली दुर्दैवी घटना... बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

विजय राऊत

कामठी (जि.नागपूर) : तालुक्यातील जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी- कवठा मार्गावरील खैरी शिवारात असलेल्या एका पॉश फॉर्महॉऊसवर मित्रांसोबत मौजमस्ती करण्यास गेलेल्या एका तरुणाचा तारानगरच्या नाल्यात बुडाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. मृत तरुणाचे नाव मो. वहिद मो. शहीद अन्सारी (२५, मोमीनपुरा नागपूर) असे आहे.

प्राप्त माहीतीनुसार ईदच्या निमित्ताने नागपूरच्या मोमीनपुरा भागातील काही तरुण जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी- कवठा मार्गावरील खैरी शिवारात असलेल्या एका पॉश फॉर्महॉऊसवर रविवारी मित्रांसोबत मौजमस्ती करण्यास आले होते. त्यांनी रविवारी संध्याकाळी फॉर्महॉऊसमध्येच मुक्काम ठोकून मौजमस्ती केली. सोमवारी सकाळी घरी जाण्यासाठी निघाले असता या फॉर्महॉऊसच्या कडेला असलेल्या तारानगर चौक जवळील नाल्यावर तुडुंब पाणी भरलेला असूनही हा नाला ओलांडून घरी जाण्याच्या बेतात नाला ओलांडून जात असता अचानक संतुलन बिघडून तरुण नाल्यात खाली पडून बुडाल्याने मृत्यू झाला.

मात्र ही घटना घडताच सोबतच्या त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला व घरच्या मंडळींना माहिती दिली. मृताच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जुनी कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविला. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

शंकाकुशंकांना उत...

या मृत्यू प्रकरणात फॉर्महॉऊसला पोलिसांनी भेट देत कसून चौकशी केली. नागपूरच्या मोमीनपुरा भागातील तरुण मंडळी ही कामठी तालुक्यात येणाऱ्या खैरी गावातील फॉर्महाऊसमध्ये कसे काय पोहोचले, या फॉर्म हाऊसमध्ये आंबट शौकीन तरुणांना स्विमिंग पूलसह सर्व गोष्टी पुरविल्या जात असल्याची चर्चा आहे. सध्या टाळेबंदी असूनही येथे या तरुणांना परवानगी कशी काय देण्यात आली. येथे कुठल्या कामानिमित्त आले, रात्रभर कसे थांबले, सोबतचा मित्र बुडत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही, हा तरुण फॉर्महाऊसच्या स्विमिंग पूलच्या पाण्यात तर बुडाला नाही ना, अशा विविध चर्चेला पेव फुटले आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT