पारशिवनी : पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी ताबडतोब करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची वाट मोकळी करण्यासाठी आंदोलन करताना शेतकरी.  
नागपूर

खरीपाची तयारी रखडली, कापूस खरेदीस विलंब, शेतकरी हतबल अन्‌ त्यांनी पुढे केले काय...

सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि.नागपूर) :  कापूस खरेदीला होत असलेला विलंब, खरेदीसाठी नोंदणीमुळे दलालांमार्फेत होणारा गैरव्यवहार, दलालांची मक्‍तेगिरी या बाबींना कंटाळून शेतकऱ्यांची सहनशक्ती संपल्याने अखेर आज दुपारी तालुक्‍यातील शेतकरी कापूस खरेदी केव्हा करणार, या प्रश्‍नाचा शासनाला जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकले व आवारात ठिया आंदोलन केले. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एकत्र आले.


शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा, खासगी जिनिंग सुरू करून शासनाने शेतकऱ्यांचा कापूस ताबडतोब खरेदी करावा, हमीभावानुसार शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या, तालुक्‍यातील खासगीसह सरकारी कापूस जिनिंग सुरू करून दररोज 50 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा व इतर मागण्यांसाठी कॉंग्रेस नेते उदयसिंग यादव यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन करून त्यांनी मागण्या शासन दरबारी मांडल्या.

शेतकऱ्यांचा कापूस घरी पडलेला
लवकरच खरीप हंगाम सुरू होणार असून या वर्षीचा कापूस अजूनपर्यंत शासनाने खरेदी केला नाही. हाती पैसा नसल्याने खरीप हंगामाची तयारी करायची कशी? शेतकऱ्यांचा कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने शेतकरी चिंतित आहे. त्यामुळे शासनाने खासगी जिनिग कंपनी ताब्यात घेऊन शासनामार्फत या खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनामार्फत केली. त्यावेळी माजी जि. प. सदस्य कोमलचंद राऊत, मधुकर बेले, प्रमोद काकडे, हर्षवर्धन निकोसे, कलाताई ठाकरे, नीलेश भोयर, सविता चिंचुळकर, प्रभाकर भोयर, मंगेश जोगळे, बंटी उपरे, मंगेश जोग, माधवराव सारवे, सपकाळ गुरुजी, शुभम राऊत, वैभव खोब्रागडे, सचिन आमले व अन्य शेतकरी उपस्थित होते.

अन्याय सहन केला जाणार नाही
खासगी जिनिंग शासनाने आपल्या ताब्यात घेऊन येथे सरकारी योजनेमार्फत शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी करावा. पालकमंत्री यांनी विनंती करून तत्काळ कापूस खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. दलालांचा कापूस खरेदी करू नये. पावसाळा महिन्याभरावर असून खरीप हंगाम सुरू होणार आहे. तालुक्‍यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणयात यावा, अन्यथा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही व तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
उदयसिंग यादव
कॉंग्रेस नेते

पावसाळ्यात कापूस खरेदी करणार काय?
हाती पैसा नाही. कापूस अजून घरीच आहे. खरीप हंगाम आला असून आता वेळ नाही. अवैध खासगी जिनिंग बंद आहे. सरकारी कापूस खरेदी सुरू आहे. पण, 15 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जातो. 1800 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आमचा नंबर काय पावसाळ्यात लागणार काय? पावसाळ्यात कापूस खरेदी करणार काय? आम्ही पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा? सगळे बेताल कामकाज झाले आहे. शेतकऱ्यांचं मरण समोर दिसत आहे.
सचिन आमले
शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT