Kidnapped and brought from Madhya Pradesh to Nagpur for signing case against three dispute between partners Sakal
नागपूर

Nagpur Crime : स्वाक्षरीसाठी अपहरण करून मध्यप्रदेशातून आणले नागपुरात; भागीदारांमधील वादातून तिघांवर गुन्हा

बांधकाम प्रकल्पातील वादातून भागीदारांनी व्यावसायिकाचे मध्यप्रदेशातील मुलताई येथून अपहरण केले. नंतर बंदुकीचा धाक दाखवित दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बांधकाम प्रकल्पातील वादातून भागीदारांनी व्यावसायिकाचे मध्यप्रदेशातील मुलताई येथून अपहरण केले. नंतर बंदुकीचा धाक दाखवित दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संदीप रामदास पेंडके (वय ४५, रा. श्रीनाश, साईनगर, अजनी) यांनी तक्रार दाखल केली. वाडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.

चंद्रशेखर तुळशीराम वाकडे (वय ५३, रा.ओंकारनगर), राखी अमर राऊत (वय ३५) अमर बाबाराव राऊत (वय ४०, रा. वसंतनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पेंडके हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी चंद्रशेखर वाकडे, राखी आणि अमर राऊत यांच्यासह भागीदारीत सुराबर्डी येथे ‘सहारा व्हॅली’नावाने २०१७ मध्ये प्रकल्प सुरू केला. दरम्यान त्यांचे आणि तिघांचे त्या प्रकल्पात आर्थिक व्यवहारातून वाद सुरू झाले.

दहा दिवसांपूर्वी संदीप पेंडके यांची आजी उषाताई रामकृष्ण पाटील यांचे बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे निधन झाले. त्यासाठी ते बैतूलला गेले होते. शनिवारी (ता.३) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चौदावीच्या कार्यक्रमात असताना त्यांचा मानलेला भाऊ संजय शाहू यासह जात असताना, चंद्रशेखर वाकडे, राखी आणि अमर राऊत हे तिथे चारचाकीने (एमएच३१एफई७७७७) पोहचले. त्यांनी संदीप यांना धक्काबुक्की करीत चारचाकी वाहनात बसविले. संजय याला त्यांनी पोलिसांना बोलाविण्यास सांगितले.

राखी राऊत यांनी वाहन चालवित त्यांना घेऊन नागपूरनजिक असलेले दहेगाव गाठले. तिथे एका ठिकाणी थांबविले. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती तिथे आली. त्याने त्यांच्या कानाखाली बंदुक लावून काही दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.

मात्र, त्याला नकार देताच, त्याने शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तिघांनीही सुराबर्डीतील सहारा व्हॅली प्रकल्पाजवळ आणून काही फ्लॅटधारकांना बोलाविले. यादरम्यान संदीप यांचा भाऊ जयदीप तिथे वाडी पोलिसांसह पोहचला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन वाडी ठाणे गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT