rape nagpur 
नागपूर

भयंकर! एकाने केला बलात्कार तर दुसऱ्यानेही सोडली नाही संधी..

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोराडी परिसरात राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर मध्यप्रदेशातील मुलताई शहरात बलात्कार करण्यात आला. ही खळबळजनक घटना कोराडीत उघडकीस आली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. आकाश अशोक कापसे (वय 28) व नंदकिशोर पगारे (वय 19,रा. मुलताई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आकाश हा चौकीदार असून, पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दोघांनी मुलीचे अपहरण केले. तिला मुलताई येथे नेले. आकाश याने तिच्याशी अश्‍लिल चाळे केले करीत विनयभंग केला तर नंदकिशोर याने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली. कोराडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.

दोघांना अटक 
मोबाइल कॉल डिटेल्स तपासले असता आकाश हा मुलीच्या मोबाइलवर सतत संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आकाश याचे टॉवर लोकेशन शोधले. तो मुलताई येथे असल्याचे स्पष्ट झाले. कोराडी पोलिसांचे पथक मुलताई येथे गेले. पोलिसांनी मुलीची सुटका करून आकाश व नंदकिशोर या दोघांना अटक केली. मुलीची चौकशी केली. आकाश याने विनयभंग तर नंदकिशोर याने बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विनयभंग व अत्याचाराचा गुन्ह्याची नोंद केली. 

कोराडी पोलिसांची लपवाछपवी? 
नववीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून एकाने अश्‍लिल चाळे तर दुसऱ्याने बलात्कार केल्याच्या गंभीर घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी कोराडी पोलिसांना वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, शेवटपर्यंत कोराडी पोलिसांनी हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला. स्टेशन डायरीवरील कर्मचाऱ्यांनी थेट पीआय साहेबांनी माहिती न देण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे कोराडी पोलिस आरोपींना सहकार्य तर करीत नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT