Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : नागपूर रेल्वेस्थानकावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रक्सोल एक्स्प्रेसमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. ही खळबळ जनक घटना नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रक्सोल एक्स्प्रेसमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. ही खळबळ जनक घटना नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करून विविध राज्यात रवाना केले आहे. अपहृत मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी केवळ ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

अपहृत मुलगी नागपूरची असून तिला आई- वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. वडील मजुरी करतात. त्यांचे बहुतांश नातेवाईक बिहारला राहातात. मे महिन्यात नातेवाईकांकडे लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण कुटुंब मुजफ्फरपूरला गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर रक्सोल एक्स्प्रेसने २६ मे रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर ते परतले. प्रवासादरम्यान अपहृत मुलगी सोबत होती. तासाभरापूर्वी आई वडिलांशी चर्चा करीत होती.

दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर स्थानकावर गाडी आली. सर्व उतरले परंतु, मुलगी कुठेच दिसली नाही. आई वडिलांनी संपूर्ण गाडीत तिचा शोध घेतला. दरम्यान वेळ झाल्याने गाडी पुढील प्रवासाला निघाली. अपहृत मुलगी परस्पर घरी निघून गेली असावी, असा अंदाज बांधला. काही वेळातच आई वडील घरी परतले. मात्र, घरी सुद्धा ती नव्हती. सर्वत्र शोध घेतला. मात्र, मुलीचा काही पत्ता लागला नाही.

अखेर त्यांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठले. सारा प्रकार सांगितला. रेल्वेतील प्रकार असल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे पाठविले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा परिसरातील एका युवकाने तिला फूस लावून पळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादिशेने पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT