killed women drop dead body in river two accused arrested squad searching for body Sakal
नागपूर

Nagpur Crime News : महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत; सना खान नंतर दुसरी घटना

दोघांना अटक : मृतदेहाच्या शोधात पथक

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : अनैतिक प्रेम संबंधांतून युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने ४२ वर्षीय महिलेचा खून करीत तिचा मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिलेचे मूळचा उत्तरप्रदेश येथील २२ वर्षीय युवकाशी एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने युवकाला लग्नासाठी तगादा लावला. त्यामुळे चौदा दिवसांपूर्वी २७ तारखेला त्याने तिला भेटायला बोलावून साथीदाराच्या मदतीने खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून पारशिवनी जवळील एक नदीत फेकून दिला. मात्र, महिला घरी परत न आल्याने नातेवाईकांनी तिच्या मिसिंगची तक्रार दाखल केली.

तपासात तिचे युवकाशी प्रेमसबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्यासह मित्राला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाचा शोधासाठी पारशिवनीकडे पथक पाठविल्याची माहिती आहे. अद्याप मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे.

सना खान नंतर दुसरी घटना

भाजप नेत्या सना खान यांच्या खून करीत आरोपी पप्पू शाहू यानेही असाच पध्द्तीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या घटनेमुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. याशिवाय अशाच प्रकारे ग्रामीण भागात मनसेच्या माजी नेत्याने दोघांचा गोळी झाडून खून करीत वर्धा नदीत मृतदेह फेकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT