kishori pednekar over rahul narvekar verdict shiv sena crisis uddhav thackeray eknath shinde politics Sakal
नागपूर

Kishori Pednekar : नार्वेकरांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती; जनताच शिंदे सेनेला जागा दाखवेल - किशोरी पेडणेकर

राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती. मात्र एक संहिता जनतेच्याही मनता असल्याचे सांगून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि शिंदे सेनेला इशारा दिला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्यावतीने बुधवारी रामटेकमधून काढण्यात येणाऱ्या स्री संवाद यात्रेसाठी त्या नागपूरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लागला म्हणून आम्ही विरोधात बोलत नाही. तो विरोधात कसा लावला गेला, हे सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत.

चांदा ते बांदा आशी यात्रा काढण्यात येत आहे. देशाचा मध्यवर्ती ठिकाण नागपूर आहे. त्यामुळे आम्ही यात्रेसाठी नागपूरची निवड केली आहे. येथून आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू. सगळ्या लोकसभाआणि विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार आहोत. महिलांचा जोश बघून तुम्हाला यात्रेची तयारी दिसलीच असेल, असेही पेडणेकर म्हणाल्या.

लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकत्रित लढणार आहेत. जागावाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांचा फॉर्म्युला ठरेल तेव्हा तो समोर येणारच आहे. जागावाटपापेक्षा जे ज्या जागेवर आहेत त्यांना आम्हाला चालना द्यायची आहे.

जे निष्ठेने थांबले त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत. आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही. त्यांना आता जनताच जागा दाखवणार आहे. आम्ही फक्त आमच्या बरोबर असलेल्या एनर्जीला हॉर्स पॉवर देण्याचे काम करतोय, असेही पेडणेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT