Krishna Khopade says Municipalities cannot be won by inquiries 
नागपूर

कृष्णा खोपडे यांचे काँग्रेसला आव्हान; चौकशांनी महापालिका जिंकता येत नाही

राजेश चरपे

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला बदनाम करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे काही नेते चौकशी समिती लावण्याचा घाट घालत आहेत. त्यांनी शहरातील सर्वच विकासकामांची खुशाल चौकशी करावी. काही गैरव्यवहार आढळले तर सांगावे, असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले.

विधानसभा अध्यक्षांनी नागपूर शहरात चौकशीच्या राजकारणासोबतच विकासाचेदेखील राजकारण करावे. पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात किती शेतकऱ्यांना दिलासा दिला, वीजबिलात सवलत का देण्यात आली नाही, याचीही चौकशी करावी. कोरोना काळात वीज ग्राहकांना अव्वाचे सव्वा देयके आली.

नवीन सरकार येताच शहरातील विकासकामांना गती आली नाही. एक वर्षात शहराच्या विकासासाठी किती दिवे लावले, याचीही अध्यक्ष नाना पटोले यांनी चौकशी करावी, अशी मागणी खोपडे यांनी केली.

विधानसभा अध्यक्षांनी सिम्बायोसिसला दिलेल्या जागेबद्दलदेखील चौकशीचे वक्तव्य केले आहे. उच्चस्तरीय विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी नागपुरातील विद्यार्थ्यांना मिळत आहे. बाजूलाच शंभर एकरांपेक्षा जास्त जागेवर स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (SAAI) सारखे विख्यात क्रीडासंकुल स्थापन होत आहे. शहरात होणारी मोठी विकासकामे काँग्रेसला बघवत नाही का, असा सवालही कृष्णा खोपडे यांनी केला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

Pune Crime : पुण्यातील घायवळ टोळीविरोधात साडे सहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Google Enters IPL : मोठी बातमी! 'गुगल'ची आता ‘IPL’मध्ये एन्ट्री होणार; ‘BCCI’ला तब्बल २७००००००००० रुपये मिळणार

Latest Marathi News Live Update: पिण्याच्या पाण्यात सांडपाणी, दुरुस्तीच्या कामासाठी २० कोटी खर्च

SCROLL FOR NEXT