नागपूर

कोंबडे लढवायला गेले अन् तुरुंगात पोहचले; दहा आरोपी गजाआड

रमेश लांजेवार

कुही (जि. नागपूर) : तालुक्यातील पारडी येथील नाल्यात सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर (roosters fighting) कुही पोलिसांनी धाड टाकून चार कोंबडे व नगदी ३,१७० रुपये जप्त केले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. रेड कारवाई दरम्यान मोक्यावर ४ कोंबडे व जुगारी इसम कोंबड्याची झुंजीवर पैशाची बाजी लावून पैशाचा हारजीतचा जुगार खेळ खेळताना रंगेहात सापडले. (Kuhi-police-raid-on-gambling)

पोलिस ठाणे कुही येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे पोलिस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पारडी गावाजवळील नाल्यात काही जुगारी कोंबड्याची झुंज लढवित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कुही पोलिसांनी अत्यंत गोपनिय माहितीची शहानिशा करून रेड कारवाई आयोजित केली. रेड कारवाई दरम्यान मोक्यावर ४ कोंबडे व जुगारी इसम कोंबड्याची झुंजीवर पैशाची बाजी लावून पैशाचा हारजीतचा जुगार खेळ खेळताना रंगेहात सापडले.

सुरेश रामाजी चौधरी (वय ५६, रा. पारडी), ऋषी संपत मते (वय ४८), प्रकाश भगवान गेडेकर (वय ५५, रा. पारडी), गेंदलाल परसराम तिरपाल (वय ४५, धानला, ता. मौदा), फागो गोपाल खवास (वय ३५, रा. पारडी), श्रीराम गजानन चन्ने (वय ३७, रा. वॉर्ड नं. २, मांढळ), किरण वसंता बाळबुधे (वय ३५, रा. पारडी), चंद्रशेखर मोहनकार (वय ४०, रा. पारडी), राजकुमार कावळे (वय ४६, रा. दहेगाव), रंजित बेशक सेलोकर (वय ३३, वॉर्ड नं. २, मांढळ) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी अंगझडती घेतली असता नगदी ३ हजार १७० रुपये व मोक्यावर मिळून आलेले ४ कोंबडे जप्त करण्यात आले. सर्व आरोपींविरुध्द पोलिस ठाणे कुही येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, पोलिस अंमलदार गिरीधर राठोड, समाधान पवार, अमोल झाडे, संदिप गुट्टे, भागवत गुट्टे, राजेंद्र देशमाने, रोशन नारनवरे, जनार्धन चाटे, आशीष खंडाईत, रंजित मेश्राम यांच्या पथकाने केली.

(Kuhi-police-raid-on-gambling)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT