washim sakal
नागपूर

'कुणी घर देता का घर', प्रख्यात कवी अनिल कांबळेंची आर्त हाक

पुरस्कारप्राप्त कवी अनिल कांबळेंची घरकुलासाठी पायपीट

राम चौधरी

वाशीम : मित्रा पोर्णिमेचा चंद्र तुझा तुला लखलाभ असू दे

माझ्या झोपडीच्या कोनाड्यात अमावशा केव्हाचीच बसली रूसून!

या कवितेने केलेला व्यवस्थेवरचा प्रहार आणि रोजच्या जगण्यातील जळजळीत वास्तव मांडलय कवी अनिल कांबळे यांनी. त्यांच्या ‘झोपडी नंबर १२’ या कविता संग्रहाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार जरी मिळाले असले तरी, त्यांची स्वत:ची झोपडी आता जर्जर झाली आहे. कवी अनिल कांबळे आपल्या झोपडीच्या डागडुजीला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही. हे वास्तव आहे.

वाशीम तालुक्यातील पार्डीटकमोर येथील कवी अनिल कांबळे यांची नामांतराच्या लढ्याच्या मुशीत जडणघडण झाली. घरावर तुळशीपत्र ठेवून चळवळी लढवल्या. अनेकांचे इमले गदागदा हलवून सोडले. चळवळी राजकीय पक्षांच्या बटीक झाल्यानंतर मनातील अन्यायाविरोधातील विद्रोह कवितेच्या रूपाने कागदावर लाव्हा रसागत पसरला. १९८५ साली सरकारने आखलेल्या गावकुसाबाहेर १० बाय १० ची कवेलूची झोपडी या विद्रोहाची साक्षीदार ठरली. या चार ओळीतच आख्खं आयुष्य गेलेल्या कवी अनिल कांबळेच्या झोपडीनेही कधीचाच विद्रोह पुकारला आहे. ग्रंथसंपदा, पुरस्काराची रीळ, नियत-अनियतकालीकाचे गठ्ठे दररोज पावसाने ओलेचिंब होत आहेत. ही झोपडी दुरूस्त व्हावी किंवा विशेष घटक योजनेतून एखादे घरकुल तरी, मंजूर व्हावे यासाठी कांबळे दररोज सरकार दरबारी पायपीट करतात मात्र, व्यवस्थेला पान्हा फुटतच नाही. व्यवस्था वांझ झाली की, आपण निगरगट्ट झालो ? असा प्रश्न हा विद्रोही कवी दररोज स्व:तलाच विचारतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

Latest Marathi News Live Update : बिहारचे मंत्री दीपक प्रकाश हे विधान परिषदेचे सदस्य बनले

Pune Traffic: सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश

Pune Investment Scam: ८८ कोटींची फसवणूक करून यूएईत पळालेली महिला गुंतवणूकदार ठग पुण्यात प्रत्यार्पणातून पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT