Khaparkheda bus stop sakal
नागपूर

Khaparkheda : बसथांबा तर आहे, प्रवासी निवारा नाही! खापरखेडा रेल्वे चौकी येथे उन्ह, वारा पावसात करावी लागते बसची प्रतीक्षा

Khaparkheda : खापरखेडा रेल्वे चौकी बस थांब्यावर प्रवासी निवाऱ्याचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना उन्हात, पावसात आणि वाऱ्यात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधाही नाही.

सकाळ वृत्तसेवा

खापरखेडा : खापरखेडा रेल्वे चौकी बस थांबा परिसरात प्रवासी निवाऱ्याची अत्यंत गरज असून बसथांब्याला प्रवासी निवारा मिळणार काय, असा सवाल नागरिक करू लागले आहेत. प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

खापरखेडा रेल्वे चौकी बस थांब्यावर चिचोली, भानेगाव, नवीन बिना, बिना(सं), सिल्लेवाडा, चनकापूर, वलनी या गावातून येणाऱ्या गावकऱ्यांसाठी मुख्य बाजारपेठेचे खापरखेडा शहर केंद्रबिंदू आहे. परिसरातील आजूबाजूच्या अनेक गावांचा खापरखेड्याशी संपर्क येतो. बाजारपेठही मोठी आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालये आहेत. मात्र प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना बसस्थांब्यावर ताटकळत बसावे लागते.

एकीकडे या मुख्य मार्गावरील प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. सावनेर, कामठी, नागपूर व पारशिवनी येथे जाणे-येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता स्टार बससेवा खापरखेड्यापर्यंत चालविली जाते. खापरखेडा-कामठी मुख्य मार्गावर महाराष्ट्र विद्यालय शाळेसमोर शेवटचा बसथांब्यावर प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहेत. मात्र, रेल्वे चौकी भागात प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही.

चिचोली ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत पाठपुरावे करण्याची गरज आहे. मात्र ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. खापरखेडा व परिसरातील शेकडो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी रेल्वे चौकी स्थानकावरूनच प्रवास करीत असल्याने या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची नितांत गरज आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या प्रवाशांना पावसात वाहनांची वाट पाहत उभे राहावे लागते.

पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय नसल्याने प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे. रेल्वे चौकीवर सार्वजनिक शौचालय शोभेची वस्तू असून कुलूपबंद आहे. प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहावे लागते. परिणामी कधी ट्राफिक जास्त असल्यास प्रवासी वाहने या ठिकाणी फार कमी वेळ थांबतात. रेल्वे चौकी परिसरातच अवैध प्रवासी वाहनेसुद्धा आपला तळ ठोकून असल्याने अपघाताची शक्यताही बळावली आहे. संबंधित प्रशासनाने रेल्वे चौकी बसथांबा येथे प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाने याबाबींकडे द्यावे लक्ष

  • नागपूरला जाण्या-येणाऱ्या प्रवाशांचे रेल्वे चौकी हे मुख्य ठिकाण.

  • नागपूर-भोपाळ व नागपूर-जबलपूर या दोन महामार्गांना जोडणाऱ्या मार्गावरील खापरखेडा हे गाव.

  • वाहनांची वर्दळ असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्याचा प्रश्न

  • पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय नाही.

  • महिला, मुली प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो

मी सेक्रेट हार्ट स्कूलला जाण्यासाठी रेल्वेचौकी बसस्टापवरुन सिटी बसने दररोज जात असतो. कधी पाऊस आला की कुठे उभे राहायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने लवकर प्रवासी निवारा बांधावा, अशी आमची मागणी आहे.

- वेदांत गजभिये, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT