नागपूर

VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

केतन पळसकर

नागपूर : रामायणातील कथेत भगवान लक्ष्मणाने आखलेली रेखा सर्वश्रुत आहे. आता नागपूर जिल्ह्यातील (कोराडी) लक्ष्मणच्या रेखेने सातासमुद्रापार डंका वाजविला आहे. जागतिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये (International handwriting competition) कलात्मक हस्ताक्षर प्रकारात लक्ष्मण बावनकुळे (Laxman Bawankule) याने संपूर्ण जगातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. संगणकाच्या या युगात लक्ष्मणच्या हस्तलिखित या अक्षरांमुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे.

लक्ष्मणचे हस्ताक्षर

लक्ष्मणचे आई-वडील दुर्दैवाने लहानपणीच वारले. त्यानंतर, त्याच्या मामाने त्याला लहानाचे मोठे केले. तर, आजीने प्रोत्साहन देत त्याला अभियंता बनण्यासाठीचा मार्ग सुकर केला. आई-वडील नसतानाही खचून न जाता त्याने मोठी मजल मारीत कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावरची नोकरी मिळविली. सध्या विद्युत केंद्र परिसरातील वसाहतीमध्ये तो वास्तव्यास आहे. लहान पणा पासूनच आखीव, रेखीव आणि सुवाच्च अक्षरांमध्ये लिहिणे ही त्याची आवड.

जागतिक हस्ताक्षर स्पर्धेच्या अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थीत आंतरराष्ट्रीय मुख्यालयाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जोडून लिहिलेले हस्ताक्षर, कलात्मक हस्ताक्षर, हस्तलिखित हस्ताक्षर अशा विविध श्रेणीमध्ये या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्याची निवड झाल्याचे स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केट ग्लॅडस्टोन यांनी ई-मेलद्वारे कळविले आहे. लक्ष्मण याने २० ते ६४ वयोगटातून कलात्मक हस्ताक्षर प्रकारामध्ये सहभाग घेत संपूर्ण जगातून पहिला क्रमांक प्राप्त केला. पेन संच, प्रशस्तिपत्र, रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी, २०१९ सालीसुद्धा त्याने भाग घेतला होता. यामध्ये, सर्व श्रेणीतून तो सर्वोत्तम ठरला होता.

लहानपणी सुंदर दिसणाऱ्या हस्ताक्षरांचा मला मोह जडला. त्याचे निरिक्षण करून-करून मी गिरवायला लागलो. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले. अशातच, या जागतिक स्पर्धेबाबत माहिती मिळाली.
-लक्ष्मण बावनकुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Dispute : धर्मादाय आयुक्तांकडून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश, बिल्डरच्या २३० कोटींबाबत महत्त्वाचा निर्णय

आनंदाची बातमी! 'सोलापूर जिल्ह्यातील ९९९६ लेकी लाडक्या'; एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा मिळू लागला लाभ

MSRTC: ‘लालपरी’ला यंदा प्रवाशांकडून ‘भाऊबीज’! दिवाळी सुटीत अवघ्या अकरा दिवसांत कमावले पावणेबारा कोटी

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT