leaf hopper on rice crop in tekadi of nagpur 
नागपूर

परतीच्या पावसानंतर धानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर)- यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धानपीक जोमात होते. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, धानपिकांवर महापुराच्या तडाख्यानंतर आता तुडतुड्या रोगाने आक्रमण केले आहे. बऱ्याच ठिकाणी परतीच्या पावसामुळे धान पीक जमिनदोस्त झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हातचे पीक गेल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. कृषी विभाग मात्र बिनधास्त दिसून येत आहे. 

सप्टेंबर महिन्यापर्यंत धानावर कुठलेही संकट नव्हते. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने धानपिकाला झोडपले. त्यानंतर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. कृषी विभागाने सबसिडीवर काही शेतकऱ्यांना कीटकनाशक उपलब्ध करून दिले, तर काहींना नाही. हजारो रुपयांचे कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र, सध्या धानपिकाची तण होताना दिसत आहे. बळीराजाला पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. तालुका पातळीवर शेतकऱ्यांनी महागडे कीटकनाशक खरेदी करण्यासाठी लगबग दिसून येत असली तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडत असल्याचे दिसून येत आहे. अशात धान कापणीसाठी १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 

कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी श्रीकृष्ण वासाडे, नारायन कडू, शंकर कडू, सुरेश खोरे, सुधाकर वासाडे, बंडू राऊत आदी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सहापैकी पाच एकरात धानाची लागवड - 
पीक उत्तम येईल, असे वाटत होते. पण, तुडतुड्याने पूर्ण धानाची तणस होत आहे. हातात पीक येण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत ३५ हजारांच्या कीटकनाशकाची फवारणी केली आहे. तरीही लागवडीचे पैसे निघेल याची शाश्वती नाही. 
बंडू राऊत, शेतकरी, टेकाडी 

परतीच्या पावसाने धान जमीनदोस्त झालाच होता. तुडतुड्याच्या प्रादुर्भावाबाबत वरिष्ठांना सांगितले आहे. पंचनामा करण्याचे आदेश आले की सर्व्हे करून अहवाल पाठवू, सबसिडीच्या औषधांचा कोटा कमी येत असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना कीटकनाशक पुरविणे शक्य होत नाही. 
संघपाल, कृषी सहाय्यक, टेकाडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT