Counseling sakal
नागपूर

Leave In Relationship : लिव्ह-इननंतर दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न; समुपदेशनाने घडविला समेट

अभियंता असलेल्या एका युवतीची पाच वर्षांपूर्वी तिच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्या मुलाशी मैत्री झाली. काही महिन्यात मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - काही वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यावर आईवडिलांनी मुलाचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. ही बाब माहिती पडताच युवतीने तक्रार कली. पण समुपदेशनाच्या माध्यमातून दोघांचाही समेट घडवून आणत, नात्यातील दूरावा अखेर दूर करण्यात यश आले.

अभियंता असलेल्या एका युवतीची पाच वर्षांपूर्वी तिच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्या मुलाशी मैत्री झाली. काही महिन्यात मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दरम्यान दोघांनीही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहताना दोघांनाही बाळ झाले. मुलगा दोन वर्षाचा झाल्यावर त्याने युवतीशी दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचे वागणे बदलल्याने युवतीही त्रस्त होती.

दरम्यान युवकाने आईवडिलांच्या घरी जाण्यास सुरुवात केली. त्याच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी तगादा लावल्याने त्याने मुलगी बघून गुपचूप साक्षगंधही उरकले.

मात्र, काही दिवसातच त्याच्या मोबाइलमध्ये साक्षगंधाचे फोटो दिसल्याने या तरुणाचे बिंग फुटले. त्यामुळे युवतीने त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यामुळे नात्यातील विण तुटत असताना, दोघांनाही समुपदेशानासाठी पालिकेच्या केंद्रात पाठविण्यात आले. यावेळी युवक आणि युवतीला समोरासमोर बसवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. याशिवाय त्यांच्या नात्याची माहिती साक्षगंध झालेल्या युवतीलाही देण्यात आली.

ही बाब कळताच, साक्षगंध झालेल्या युवतीसह तिच्या परिवाराने लग्न मोडले. युवकाच्या कुटुंबाचीही समजूत काढून दोघांचेही लग्न करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोघांच्याही नात्याचा शेवट गोड झाला. समुपदेशनासाठी शालिनीताई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे गांधीबाग झोनच्या महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्ष मंगला महाजन यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT