नागपूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) चार वर्षांपूर्वी राज्यातील विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रमात बदल करण्याच्या उद्देशाने नवा अभ्यासक्रम तयार करून देण्यात आला. अभियांत्रिकीच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये क्रेडिट पॉइंट घटविल्याने बेसिक सायन्सच्या विषयांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे या विषयांमध्ये प्राध्यापक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेद्वारे अडीच वर्षांपूर्वी विद्यापीठाला अद्ययावत अभ्यासक्रम पाठविण्यात आला. विद्यापीठात अभ्यासमंडळ अस्तित्वात नसल्याने या अभ्यासक्रमात बदल करता आला नाही. विद्यापीठात अभ्यासमंडळाची निर्मिती होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी झाला. यादरम्यान अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या अभ्यासमंडळात यावर चर्चा करुन नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती करणे आवश्यक होते. मात्र, त्यात विविध ‘स्कीम’चा उल्लेख नसल्याचे कारण देत, अभ्यासमंडळातील इतर सदस्यांनी आक्षेप घेतला.
विशेष म्हणजे अभ्यासक्रम तयार करीत असताना, त्यात उद्योगातील अनुभवी व्यक्तींचाही सहभाग नोंदविणे आवश्यक होते. तसे काहीच झाले नाही. तसेच ऐन प्रवेशाच्या काळात समितीने चार ते पाच महाविद्यालयात केलेल्या कार्यशाळेला प्राध्यापकांचा अल्प प्रतिसाद लाभला होता.
दुसरीकडे एकाच वेळी चारही वर्षाचा अभ्यासक्रम तयार करुन तो संकेतस्थळावर टाकणे गरजेचे असते. मात्र, समितीकडून केवळ एकाच वर्षाचा अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. सीबीसीएस स्कीमचा अभ्यासक्रमाशी सुसंगत नव्हते. विशेष म्हणजे याबाबत एका वर्षांपासून एकही बैठक घेतल्या गेलेली नाही.
त्यामुळे अभ्यासक्रम कसा आहे, हे कुणाला कळलेच नाही. यामध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या अभ्यासक्रमाल थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता नव्या कुलगुरूंनी याबाबत रस घेतला असल्याचे समजते. पुन्हा एकदा याचप्रकारे अभ्यासक्रमात मनमानी बदल करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
एआयसीटईकडून देण्यात येणारे क्रेडीट
राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमात यापूर्वी २०० ते २२५ क्रेडीट पॉईन्ट ठेवण्यात आले होते. यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रत्येक सत्रात किमान तीन ते चार प्रात्यक्षिकांचा समावेश होता. मात्र, आता हे क्रेडीट पॉईन्ट १६० वर आणण्यात आले आहे.
यामुळे प्रत्येक सत्रात किमान एक ते दोनच प्रात्यक्षिक घेता येणार आहेत. १६० पैकी जवळपास १५ क्रेडीट हे प्रोजेक्ट आणि सेमिनारला देण्यात आले आहे. प्रत्येक सत्रात कोअर शाखांचे विषय कमी झाल्याने प्राध्यापकांची संख्येतही कमालीची घट होणार आहे हे विशेष.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.