Vidarbha BJP MLA Legislative Council members 
नागपूर

मुख्यमंत्री समर्थकांना आशेचा ‘किरण’

विधान परिषदेसाठी बाप्पा कोणाला पावणार?

राजेश चरपे

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने दिलेली विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या आमदारांची यादी परत पाठविल्याने विदर्भातील भाजपमधील इच्छुक तसेच मुख्यमंत्री शिंदे समर्थकांमध्ये आशेचा ‘किरण’ निर्माण झाला आहे.

राज्यपालांना एकूण १२ सदस्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करायची आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या नावांच्या यादीला राज्यपालांनी सरकार असेपर्यंत परवानगी दिली नव्हती. आता सत्ताबदल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता राज्यात आली आहे. आघाडी सरकारने दिलेली उमेदवारांची यादी रद्द करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्यपालांनी ती लगचे मान्य केली. यादी रद्द केल्याचे जाहीरसुद्धा केले. त्यामुळे आता शिंदे सेना आणि भाजपमार्फत नवीन यादी पाठवण्यात येणार आहे.

ठरलेल्या सूत्रानुसार शिंदे सेना यांना चार तर भाजपला आठ जागा मिळणार आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक बेडे नेते व माजी आमदार सोबत आले आहेत. त्यांना सामावून घेण्याची कसरत शिंदे यांना करावी लागणार आहे.

जागा कमी, इच्छुकांची भरमार

भाजपकडे जागा कमी आणि इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे. विधान परिषदेवर मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रावर जास्त फोकस रहाणार असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम राहील. हे बघता विदर्भातील त्यांच्या काही कट्टर समर्थकांची वर्णी लागू शकते. त्यामुळे काही इच्छूक आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही अशा संभ्रमात पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT