Lemon one for five rupees Demand is low as restaurants are closed 
नागपूर

बापरे बाप! लिंबू पाच रुपयाला एक; उपाहारगृहे बंद असल्याने मागणी कमी

राजेश रामपूरकर

नागपूर : उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने काही दिवसांपासून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. एरवी घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीची विक्री ८० ते १४० रुपये दराने केली जाते. तर सध्या कळमना आणि फुले मार्केटमध्ये घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीला (३५० ते ४५० लिंबे) विक्री एक ते सव्वा हजार रुपये या दराने केली जात आहे.

किरकोळ ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबांचे दर तेजीत असतात, असे महात्मा फुले मंडी फळ-भा‌जी ब्रोकर्स असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. हंगामात दररोज चार ते पाच हजार गोण्यांमधून लिंबांची आवक होते. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने लिंबांची आवक कमी झाली आहे. एक ते दीड हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. उन्हाळा संपेपर्यंत लिंबांचे दर तेजीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे लिंबांना मागणी कमी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लिंबांची आवक कमी होत असल्याने लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी भाजी बाजार बंद असल्याने आज सकाळी महात्मा फुले बाजार आणि कळमना बाजारात घाऊक भाजी विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली.

दरम्यान, सर्वच भाज्यांची आवक चांगली असल्याने दर स्थिरावलेले आहेत. बाजारात भाज्यांची १२० पेक्षा जास्त गाड्याची आवक झाली. उन्हं तापू लागल्याने आता भाजीचे उत्पादनही कमी होत आहे. १५ दिवसानंतर भाजीचे भाव वाढण्यास सुरवात होईल, असे महाजन यांनी सांगितले.

भाजीपाला - दर (रुपये प्रतिकिलो) 

  • वांगे - १० 
  • टोमॅटो - १५ 
  • फुलकोबी - १० 
  • पानकोबी - ०८ 
  • चवळीच्या शेंगा -३० 
  • कारले - ३० 
  • गवारशेंगा - ४० 
  • पालक - १० 
  • मेथीची भाजी - २० 
  • कोहळा - १५ 
  • शिमला मिरची - ३० 
  • कोथिंबीर - २० 
  • भेंडी - ४० 
  • दुधी भोपळा - १० 
  • काकडी - १५ 
  • मुळा - १५ 
  • गाजर - १५ 
  • हिरवी मिरची - २५ 
  • भेंडी -३० 
  • ढेमस - ३० 
  • कैरी - ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT