crime 
नागपूर

काकावर भुंकला पुतण्याचा कुत्रा, नंतर घडली होती ही घटना..आता

सकाळवृत्तसेवा

नागपूर : विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे.

गजानन नारायण चव्हाण (३५) असे आरोपीचे नाव असून तो वाई हातोला येथील रहिवासी आहे. आरोपीचे वडील नारायण व लहान भाऊ रमेश हेदेखील प्रकरणात आरोपी आहेत. नारायणला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. रमेश फरार आहे. मयताचे नाव श्यामराव चव्हाण होते. तो आरोपी नारायणचा लहान भाऊ होता.

खुनातील आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाने ठेवली कायम
२ जुलै २००९ रोजी आरोपींचा कुत्रा मयत श्यामराववर भुंकला होता. श्यामरावने कुत्र्याला मारले. त्यावरून आरोपींनी श्यामरावला काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे, त्याचा मृत्यू झाला होता. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली.

त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या प्रकरणी न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

Nagpur News : नागपुरात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! आतंकवादाच्या खोट्या केसची भीती दाखवून महिलेला १३ लाखांचा गंडा; बनावट 'अरेस्ट ऑर्डर'ने उडविली झोप

Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

SCROLL FOR NEXT