ST
ST Sakal
नागपूर

ज्येष्ठांच्या प्रवासावर मर्यादा!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिरुदावली घेऊन धावणाऱ्या एसटी महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. महामंडळ ७४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाच एसटीचा कणा असलेल्या प्रवाशांना महामंडळाने धक्का दिला आहे. ज्येष्ठांना प्रवासासाठी आता चार हजार किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येते. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आपले केवळ ओळखपत्र दाखवावे लागत होते. आता महामंडळाने सवलत धारकांसाठी ‘स्मार्टकार्ड’ योजना आणली. स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड बनविण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर १ जुलैपासून ‘स्मार्टकार्ड’ सवलतधारक ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता बंधनकारक राहील.

याच बरोबर ‘स्मार्टकार्ड’च्या या सवलतीला आता मर्यादा घालून देण्यात आली आहे. ही मर्यादा ४ हजार किलोमीटरची आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी अशी मर्यादा नव्हती. मात्र, किलोमीटरची मर्यादा घालून देण्यात आल्याने ज्येष्ठांचा प्रवास सुद्धा मर्यादित होणार आहे. एसटी महामंडळाने आपल्या ७४ व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा ‘धक्का’ दिला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी दिसून येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नागपूर व अमरावती विभागाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

‘स्मार्टकार्ड’ची मर्यादा व प्रवास

  • ६५ वर्षावरील सर्व नागरिकांना ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक

  • प्रवासात वाहकाकडे असलेल्या ‘ईटीआय’मशीनमध्ये प्रवासाची नोंदणी होईल.

  • स्मार्टकार्ड ४ हजार किलोमीटर झाल्यावर संपेल.

  • त्यानंतर पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागतील

  • एक वर्षानंतर कार्डचे नूतनीकरण करता येईल. नोंदणीसाठी ५० रुपये द्यावे लागतील.

  • नागपूर ते पुणे, मुंबई, पंढरपूर व इतर अशा ४-५ फेऱ्या केल्यास १ आठवड्यात ४ हजार किलोमीटर संपण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT