nagpur sakal
नागपूर

Nagpur : पंचायत समिती परिसरात तळीरामांचा अड्डा?

आवारात दारूच्या बाटल्यांचा खच; महागड्या इंग्रजी दारूचे ब्रांड

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : तालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समितीतील बांधकाम विभागात ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रकार सुरू असतानाच याच विभागाच्या मागील परिसरात ब्रांडेड महागड्या दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला आहे. यामुळे पंचायत समिती कार्यालयाच्या मागील परिसरात कार्यालय बंद झाल्यानंतर दारूचे पेग कोण रिचवितो? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगणा पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागातील अभियंता व कर्मचारी सायंकाळी सहा वाजता नंतर कार्यालयात येतात. यानंतर हा विभाग रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. या ठिकाणी मर्जीतील विशिष्ट लोकांना कामे केली जात असल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत हा विभाग सुरू राहत असल्याने नेमके या विभागात रात्री उशिरापर्यंत अशी कोणती विशिष्ट कामे केली जातात, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाच्या मागील परिसरात विदेशी दारूच्या ब्रँडेड बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात पडून आहे.

रात्री उशिरापर्यंत हा विभाग सुरू राहत असल्याने येथे नेमके कोणती लोकं कामासाठी येतात हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मग महागडे दारूचे ब्रँड घेऊन या कार्यालयात नेमके लोक कोणासाठी येतात,याबाबतही तर्क वितर्क सुरू झाला आहे.

पंचायत समितीच्या मागील परिसरात असलेल्या आवारात रात्रीच्या वेळी दारूचा अड्डाच भरतो का? असा संभ्रमही आता निर्माण झाला आहे.तालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समितीची ओळख आहे. या विभागात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक,कर्मचारी आणि एक कंत्राटी कर्मचारी असे पाच कर्मचारी कार्यरत आहेत. बांधकाम विभागाच्या अगदी मागील परिसरातच दारू आणून पिण्याचा प्रकार सुरू असेल तर खंड विकास अधिकाऱ्याच्या पाठीमागे हा प्रकार सुरू आहे का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

पंचायत समिती प्रशासनाची प्रतिमा तालुक्यात चांगली आहे. मात्र या प्रकारामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. हा या प्रकारावर तातडीने आळा बसविणे गरजेचे आहे. यासाठी खंड विकास अधिकारी आता काय भूमिका घेतात, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT