Live in Relationship couple family dispute 
नागपूर

प्रेयसीच्या समजुतदारपणाने वाचला दोघांचा संसार

समुदेशनातून झाले दोघांचेही लाईफ ‘ओक्के’

मंगेश गोमासे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या क्रेझपोटी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याच्या निर्णय एका तरुणीने घेतला. या प्रेमातून त्यांना एक अपत्यही झाले. काही वर्षे सोबत राहिल्यावर दुसरीवर प्रेम जडल्याने तरुणाने आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेळीच समुपदेशन केंद्राच्या मदतीने तिसरीचे मार्गदर्शन केल्याने तिने माघार घेतली. यातून दोघांचाही संसार वाचला.

बदलत्या युगात आता प्रेमाचे प्रकारही बदलले आहेत. नव्या प्रेमाची संकल्पना म्हणून सध्या खूपच प्रचलित झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीमध्ये याचे क्रेझ जरा जास्तच आहे. त्यातून आजकाल ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, अनेकदा या प्रेमात ट्विस्ट निर्माण होताना दिसून येतो. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार घडला. २८ वर्षीय तरुणीचे २७ वर्षीय तरुणावर प्रेम जडले. त्यातून दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल पाच वर्षे एकमेकांसोबत राहिल्यावर त्यांना एक अपत्यही झाले.

मात्र, यादरम्यान तरुणाचे दुसऱ्याच मुलीवर प्रेम जडले. यातून त्यांच्या आनाभाकाही सुरू झाल्या. ही बाब २८ वर्षीय तरुणीला माहिती पडली. तिने त्याला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची नजर चुकवून तो तिच्याशी भेटायचा. दोघांनी लग्न करण्याचेही ठरविले. दरम्यान, ही बाब कोतवाली पोलिसांकडे येताच, त्यांनी प्रकरण महाल येथील शालीनीताई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिला व बालविकास केंद्राद्वारे झोन सहामधील महापालिकेच्या समुपदेशन केद्राकडे पाठविले.

समुपदेशन केंद्रातील मंगला महाजन, दीप्ती मेंढेकर व सारिका चवरे यांनी दोघांचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची माहिती घेताना समोर आलेल्या तथ्यातून त्यांची मनधरणी करण्यास सुरवात झाली. विशेष म्हणजे, दोघांसह तरुणाच्या प्रेयसीलाही समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले. यावेळी तिचे मतपरिवर्तन करीत, मुलास लग्नाला नकार देण्यास सांगण्यात आले. तिने ते केल्याने दोघांनीही संसार सुरळीत करण्यास मदत झाली.

असा झाला गैरसमज

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणाच्या मनात असलेल्या गैरसमजातूनच हा प्रकार घडल्याची बाब समुपदेशातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या आई वडिलांचेही ‘लिव्ह इन’ असल्याने त्यातून वडिलांनी त्यांचा त्याग केला होता. यावेळी वडिलांना काहीच शिक्षा न झाल्याने त्यानेही त्याच समजुतीतून हा प्रकार केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT