mundhe 
नागपूर

नागपुरात पुन्हा लॉकडाऊन? निर्णयासंदर्भात तुकाराम मुंढेंचे एकला चलो रे!

नीलेश डोये

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा लॉकडाउन करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु काही अधिकाऱ्यांचा याला विरोध आहे. पहिल्या टप्प्यातील अनुभव पाहता गरीब वर्गातील नागरिकांचाही विरोध आहे.

त्यामुळे सर्व सनदी अधिकाऱ्यांनी एकत्र बसून आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. शिवाय नागरिकांना किमान सहा-आठ दिवसांचा वेळ देण्याच्याही सूचना केल्या होत्या. मात्र आतापर्यंत अधिकाऱ्यांची या संदर्भात बैठकच झाली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान मनपा आयुक्त मुंढे यांनी दोन- चार दिवसात लॉकडाउन करण्याचा इशारा दिल्याने त्यांची 'एकला चलो रे' ची भूमिका असल्याची टीका होत आहे.

गेल्या चार महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा तीन हजारांवर गेला. याच्या नियंत्रणाकरता दोन-अडीच महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात अनेकांचा रोजगार गेला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. नोकरी गेल्याच्या नैराश्‍यातून काहींनी जीवन यात्रा संपविली.
कोरोनाची साखळी तोडण्याचे कारण पुढे करीत पुन्हा महानगर पालिका आयुक्त मुंढे लॉकडाऊन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसा त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यातच लॉकडाऊन करण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु याला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे. अनेक लोक प्रतिनिधीही याच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांना खत, बियाण्यांसाठी शहरात यावे लागते. लॉकडाउन 10-15 दिवसांचे करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

सविस्तर वाचा - मैदानावरच्या सरावाला ऑप्शनच नाही, घरात राहून होतंय "बोअर'!

पोलिस आयुक्त व ग्रामीण पोलिस अधीक्षकही अनुकुल नसल्याचे सांगण्यात येते. अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्‍यता नसल्याने एका बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र बसून लॉकडाउनचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु पाच दिवसात या अधिकाऱ्यांची बैठकच झाली नसल्याची माहिती आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT