lockdown leads starvation of relatives of the paitent  
नागपूर

ताई, भाजीपोळी देता का?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ताई, माझे नातेवाईक मेडिकलमध्ये भरती आहेत. त्यांच्याजवळ माझी लहान मुलं आहेत. हॉटेल बंद आहेत. त्यांना कसं खाऊ घालावं हेच कळत नाही. जरा भाजी पोळी देता का? अशी विनवणी करणारी महिला वंजारीनगरात निवासी गाळ्यासमोर उभी होती. ज्या घरासमोर ही महिला उभी होती, त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. या महिलेस भाजीपोळी देण्यात आली. हातात भाजीपोळी घेऊन ती महिला मेडिकलमध्ये पोहचली.

मध्यप्रदेशातील काही नातेवाईक मिडास हाईट पुढे उपाशी बसून होते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रविवारी जनता संचारबंदी शहरात लागू केली गेली. यामुळे 95 टक्के औषधांच्या दुकानांसह तपासणी केंद्र बंद होते. त्यात स्थानिक प्रशासनाने 31 मार्चपर्यंत शहरातील हॉटेल्स आणि रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश असल्याने रस्त्यावर चहादेखील मिळत नाही. यामुळे मध्य प्रदेशातून आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली आहे. शहरात एकही हॉटेल उघडे नसल्याने नातेवाईकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. मेडिकलमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांवर दारोदार जाण्याशिवाय पर्याय नाही.

मध्यप्रदेशातील मंडला येथील सुमन झारिया या महिलेसह पाच जण रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून बिस्किटांवर रात्र काढत आहेत. यांच्या घरातील एक महिला मागील आठवड्यात भोवळ आल्याने खाली पडली. उपचारासाठी नागपुरात आणले. मिडास हाईट येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कसेतरी उसनवारी करून उपचार सुरू असताना त्यात बंदचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना बसला. मेडिकल, मेयोत रोज दोनशेहून अधिक वेगवेगळ्या आजाराचे अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी येतात.

त्यापैकी अनेक रुग्ण बस किंवा रेल्वेने येतात. काही इतर साधनांनी नातेवाईक रविवारी नागपुरला आले. परंतु, बसस्थानक व रेल्वेस्थानकावर ऑटोरिक्षांसह इतर साधने जवळपास नसल्याने त्यांना तेथे पोहचण्यासाठी त्रास सहन करावा लागला. रुग्णांसह नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने आवश्‍यक सुविधा पुरवण्याची मागणी येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT