Lockdown will cure many addictions 
नागपूर

खर्रा शैकीन सोप, ओव्यावर काढत आहेत दिवस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे दारूची दुकाने व पानटपरी बंद आहेत. पोलिसांच्या भीतीने घरातून बाहेर पडणे कठीण आहे. त्यामुळे अनेक जण घरीच आहेत. यातील काही व्यसनमुक्तीच्या वाटेवर आहेत. विशेष म्हणजे दिवसभर घरीच असल्याने कुटुंबीयांकडूनही व्यसन सोडण्यासाठी पाठिंबा मिळत आहे तर खासगी प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्यांना खिसे रिते झाल्याने व्यसन न परडवणारे झाले. मात्र, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्यांचा "जुगाड'ही सुरू आहे. 

लॉकडाउनच्या काळात शहरातील दारूची दुकाने व बार बंद आहेत. संचारबंदी असूनही शहरात अनेक ठिकाणी दारू मिळते. परंतु, दारूचे दर सामान्यांच्या अवाक्‍याबाहेर आहेत. त्यामुळे गेल्या चाळीस दिवसांत अनेकांना दारूकडे ढुंकून पाहणेही कठीण झाले. यात प्रामुख्याने खासगी प्रतिष्ठान, संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. काही दुकानदार कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. संस्थांनीही वेतनात कपात केली. अशा परिस्थितीत त्यांना दारूचे व्यसन न परवडणारे झाले आहे. परंतु, सर्वांचीच दारू सुटेल असे नाही, असे साहस व्यसनमुक्ती केंद्राचे विजय शेंडे यांनी नमूद केले.

दारूच्या आहारी गेलेले काही ना काही उपाय शोधत आहे. त्यांचीही दारू सुटण्याची शक्‍यता आहे. परंतु, यासाठी डॉक्‍टर, समुपदेशक यांचा सल्ला तसेच कुटुंबीयांचा पाठिंबा आवश्‍यक असल्याचे शेंडे म्हणाले. दारूप्रमाणेच खर्रा व सिगरेटचीही स्थिती आहे. पानटपरी बंद असल्याने अनेकांचे खर्रा खाणे बंद झाले. एवढेच नव्हे तंबाखू तयार करणाऱ्या कंपन्या बंद असल्याने सुगंधित तंबाखूही बाजारात नाही. त्यामुळे अनेक जण घरातील सोप व ओवा यावर आले आहेत. 

काही प्रमाणात खर्रा मिळत असला तरी त्याचा दर्जा चांगला नाही किंवा महाग आहे. त्यामुळे अनेकांनी खर्रा खाणे बंद केले. पोलिसांच्या अनेक प्रश्‍नांना उत्तर द्यावी लागत असल्याने अनेक जण बाहेर जाण्याचेही टाळत आहे. त्यातच गृहिणीही पतीच्या व्यवसावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. महागाई, सहज उपलब्ध होत नसल्याने दारू, खर्रा, सिगरेट आदीकडे अनेकांनी तूर्तास पाठ फिरविली आहे. 

मनपाने जनजागृती करण्याची गरज

महापालिका सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनजागृती करीत आहे. यासोबतच महापालिकेने नागरिकांना व्यसनमुक्तीची संधी असून, त्याचा लाभ घेण्यासंदर्भातही जनजागृतीचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यामुळे काही नागरिकांना नक्कीच व्यसनमुक्त करता येईल, असेही विजय शेंडे यांनी नमूद केले.

व्यसनमुक्तीसाठी कुटुंबांचा पाठिंबा गरजेचा 
घरांमध्ये असल्याने काहींचे व्यसन सुटण्याची शक्‍यता आहे. परंतु, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांकडून ही अपेक्षा चुकीची आहे. आता लॉकडाउनच्या काळात व्यसन सोडण्याची संधी आहे. यासाठी समुपदेशन, डॉक्‍टरांचा सल्ला आवश्‍यक आहे. व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधता येईल. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी कुटुंबांचा पाठिंबा गरजेचा आहे. 
- विजय शेंडे, 
साहस व्यसनमुक्‍ती केंद्र, मानेवाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT