Money Expenditure in loksabha election sakal
नागपूर

Loksabha Election : निवडणुकीमुळे कोट्यवधीचे चलन बाजारात; भाजप, काँग्रेस आघाडीवर

निवडणूक विभागाच्या आधारे गेल्या दहा दिवसातच लाखो रुपये विविध खर्चांच्या माध्यमातून बाजार आला आहे.

नीलेश डोये

नागपूर - निवडणुकीत विजयासाठी सर्वच उमेदवारांकडून पूर्ण ताकद लावण्यात आली असून त्यासाठी प्रचारही जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोट्यवधींचे चलन बाजारात आले आहे.

निवडणूक विभागाच्या आधारे गेल्या दहा दिवसातच लाखो रुपये विविध खर्चांच्या माध्यमातून बाजार आला आहे. हा घोषित आकडा असला तरी अघोषित आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याची चर्चा आहे.

नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. नागपुरात २६ तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. विशेषतः राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची यात आघाडी आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडून रोज प्रचार रॅली काढण्यात येत असून सभाही घेण्यात येत आहेत. यावर खर्चही होत आहे. नुकतीच उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला सादर केली. उमेदवारांनी दाखवलेला खर्च व निवडणूक विभागाच्या मते झालेला खर्च यात तफावत आहे.

निवडणूक विभागाचा विचार केल्यास गेल्या दहा दिवसात दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांकडून जवळपास एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. यात भाजप, कॉंग्रेस व शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. इतरही उमेदवारांकडून खर्च करण्यात येत आहे.

अधिकृतरीत्या खर्चाची रक्कम एक कोटीच्या जवळपास असली तर अनधिकृतपणे खर्चाची रक्कम यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याची चर्चा होत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून कोट्यवधींचे चलन बाजारात आल्याचे दिसते.

पोस्टर,बॅनर, पॉम्प्लेट व्यवसायाला अच्छे दिन

प्रचारासाठी उमेदवारांकडून पोस्टर,बॅनर, पॉम्प्लेटचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या व्यवसायाला निवडणुकीच्या काळात या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत.

अनेकांच्या हाताला काम

निवडणूक काळात मेळावा, सभांसाठी वाहनांचा वापर होतो. त्यामुळे वाहनांना असलेली मागणी वाढते. परिणामी वाहनचालकांच्या हाताला काम मिळाले. उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना मतदारसंघात प्रचारासाठी घेऊन जाण्यासाठी वाहनांचा उपयोग होत आहे. पोस्टर, बॅनर्स लावण्याचे कामही सुरू आहे. पॉम्प्लेटचे वितरण केले जात असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT