नागपूर

बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णालयांतील त्रुटींचा शोध घ्या; उच्च न्यायालयाचे आदेश

केतन पळसकर

नागपूर : बुरशीजन्य आजाराचा (mucormycosis) प्रसार रोखण्यासाठी शहरातील रुग्णालयामधील त्रुटींचा सर्वेक्षणाद्वारे शोध घेत दोन आठवड्यांमध्ये अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (High Court Order) शीघ्र कृती दलाला दिले. तसेच या सर्वेक्षणासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही नमूद केले आहे. (Look-for-defects-in-hospitals-to-prevent-the-spread-of-the-Black-fungus)

कोरोनाग्रस्त रुग्णांची होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, नागपूर शहरासाठी विभागीय आयुक्तांनी कृती दल स्थापन केले आहे. मात्र, हे कृती दल म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारासंदर्भातच कार्य करीत आहे. तसे न करता इतर बुरशीजन्य आजारांसाठी या कृती दलाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करा, असे आदेश न्यायालयाने विभागीय आयुक्तांना दिले.

तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि राज्य शासनाने रुग्णालयातील स्वच्छते विषयी रुग्ण, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना जागरूक करावे. रुग्णालयातील यंत्र सामग्रीची वेळोवेळी स्वच्छता करावी, असेही नमूद केले. पुढील सुनावणी ९ जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, अ‍ॅड. संतोक सिंग सोखी, अ‍ॅड. अभिजित देशमुख, राज्य सरकारतर्फे प्रभारी मुख्य सरकारी वकील केतकी जोशी, अ‍ॅड. डी. पी. ठाकरे, अ‍ॅड. एन. एस. राव, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांच्यासह अ‍ॅड. एम. अनिलकुमार, अ‍ॅड. बी. जी. कुलकर्णी, अ‍ॅड. तुषार मंडलेकर आदींनी विविध पक्षकारांतर्फे बाजू मांडली.

वितरण कुठल्या तत्त्वावर?

बुरशीजन्य आजारासाठी आवश्‍यक असणाऱ्या औषधींचे राज्याराज्यामध्ये होणारे वितरण कुठल्या आधारावर होत आहे, याची कल्पना नाही. देशाची रुग्णसंख्या पाहता राज्यामध्ये, त्यातल्या त्यात शहरामध्ये या आजारांवरील रुग्ण जास्त आहेत. रुग्णसंख्येनुसार औषधांचा पुरवठा होत नाही. रुग्णांचे आकडे पाहता राज्यासाठी आणि नागपूर शहरासाठी ही युद्धजन्य परिस्थिती आहे. मात्र, राज्य शासनाच्या मूलभूत कर्तव्यानुसार पावले उचलण्यात येत नसल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.

(Look-for-defects-in-hospitals-to-prevent-the-spread-of-the-Black-fungus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT