high court sakal
नागपूर

विवाहितेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा गुन्हाच : उच्च न्यायालय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर प्रमेपत्र फेकणे किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (nagpur bench of mumbai high court) दिला आहे. विदर्भातील अकोला (akola) जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केलं.

अकोला येथील एका महिलेने २०११ मध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीवर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. आरोपीने पीडित महिलेला एक चिठ्ठी दिली होती. ती घेण्यास तिने नकार दिला होता. त्यानंतर आरोपीने ती चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असं तो तिला म्हणाला. कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर पीडित महिलेने अकोल्यातील सिव्हील लाइन्स पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला २ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयानेसुद्धा आरोपीला दोषी ठरविले. ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे. त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही. अशात एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT