crime Sakal
नागपूर

प्रेमसंबंध अंगलट : प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

वयाच्या १४ व्या वर्षात असतानाच मुलीला शेजारी राहणाऱ्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर सलग चार वर्षे बलात्कार केला.

अनिल कांबळे

नागपूर - वयाच्या १४ व्या वर्षात असतानाच मुलीला शेजारी राहणाऱ्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर सलग चार वर्षे बलात्कार केला. यातून तिला गर्भधारणा झाली. तिने नुकताच गोंडस मुलीला जन्म दिला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संदीप रामू पंचेश्‍वर (२१, रा. एकात्मतानगर) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) आणि आरोपी संदीप पंचेश्‍वर हे दोघेही एमआयडीसीत एका परिसरात राहतात. रियाचे आई-बहिण मोलमजुरी करतात. तिने शिक्षण सोडून आईला हातभार लावत होती. तिच्याच वस्तीत संदीप हा ॲल्युमिनियमच्या खिडक्या बनविण्याचे ठेके घेतो. दोघेही एकाच वस्तीत राहत असल्याने ४ वर्षापासून त्यांच्यात ओळख होती. रियाच्या घरी कुणा राहत नसल्याची संधी साधून तो तिच्या घरी जायला लागला. ती १४ वर्षांची असतानाच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

२०२० मध्ये मुलीची आई आणि बहीण कामावर गेली होती. त्यावेळी मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून संदीप तिच्या घरी आला. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. त्याने बळजबरी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करायला लागला. फेब्रुवारी २०२१ मध्ये रिया गर्भवती झाली. परंतु, तिने ही माहिती कुणालाही सांगितली नाही. पाच महिन्याची ती गरोदर असताना तिने ही माहिती आपल्या बहिणीला दिली. तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उशीर झाल्याचे सांगून गर्भपात करण्यास नकार दिला. १७ ऑक्टोबर रोजी मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला वानडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचदिवशी तिने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी पाठविलेल्या अहवालावरून शेवटी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी संदीपवर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT