love trap crime abuse of minor girl by giving medicine nagpur crime Sakal
नागपूर

Nagpur Crime : प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nagpur Latest Crime News : जरीपटक्यातील घटना; २४ वर्षीय गुंडास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून १७ वर्षीय मैत्रिणीला सुपारीतून गुंगीचे औषध देत, तिच्या अत्याचार केल्याप्रकरणी २४ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना जरीपटका पोलिस हद्दीत उघडकीस आली.

श्‍लोक विशाल शेंडे (वय २४, रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुंड असून खुनातील आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला जात असताना श्‍लोक तिथे यायचा.

तिथे त्याची आणि मुलीची ओळख झाली. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यामुळे लपून छपून भेटत होते. यादरम्यान त्याने तिला सुपारीतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान ही बाब तिच्या लक्षात येताच, तिने त्याच्याशी बोलणे सोडले. मात्र, त्यानंतर तो तिच्या मागे लागला. एक दिवस तिला जबरदस्तीने गिट्टीखदान परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर तिला शिवीगाळ करीत, ही बाब कुणालाही सांगितल्यास चाकूने ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे मुलीने आईला सांगितले. आईने शनिवारी (ता.२९)जरीपटका पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT