Lover shared pornographic photos of beloved on WhatsApp crime news 
नागपूर

बसमधील मैत्री भोवली, प्रेमाच्या जाळ्यात ओढून शोषण

अश्लील फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

प्रवासादरम्यान झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. याचा लाभ घेऊन तरुणाने प्रेयसीवर तिच्याच घरी वारंवार लैंगिक शोषण केले. तिचे अश्लील फोटोही काढले. नंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. युवतीने कंटाळून संबंध तोडल्याने युवकाने तिचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रूपवर व्हायरल केले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकराविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. विकास ऊर्फ कुंदनकुमार सिंग (२७) असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, विकास मुळचा श्रीरामपूर, पाटना येथील रहिवासी आहे. मौदाच्या एनटीपीसीमध्ये तो मशिन ऑपरेटर आहे आणि तेथेच राहतो. पीडित तरुणी गोंदिया येथील रहिवासी असून रामदासपेठच्या एका रुग्णालयात परिचारिका आहे. सीताबर्डी परिसरात भाड्याने खोली करून राहते. डिसेंबर २०२१ मध्ये बसमधून प्रवास करताना पीडितेची ओळख विकासशी झाली. दोघांमध्ये मैत्री होऊन त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले.

विकासने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी तिच्या खोलीवर जाऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले. गत काही दिवसांपासून विकास पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दुसऱ्या कोणाशी बोलण्यापासून अडवत होता. शिवीगाळ करून धमकावत होता. त्रस्त होऊन पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला. यामुळे संतापून विकासने तिचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रूपवर व्हायरल केले.

पीडितेला याची माहिती मिळाली. तिने विकासविरुद्ध सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि आयटी अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तक्रारीची माहिती मिळताच विकास फरार झाला आहे. तो बिहारला पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. लवकरच एक पथक त्याला शोधण्यासाठी बिहारला रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT