नागपूर

धक्कादायक! विद्यार्थिनीने दिली चक्क ICU मधून परीक्षा; विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाकाळातही (Corona) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे आदेश विद्यापीठाने (Nagpur University) देत, आजपासून परीक्षा सुरू केल्या. याची परिणिती म्हणजे परीक्षेचे टेन्शन घेत एका कोरोनाबाधित एम.टेक (M.Tech).च्या विद्यार्थिनीला अतिदक्षता (आयसीयू) (ICU) वॉर्डातून परीक्षा द्यावी लागली. विशेष म्हणजे, काही अन्य बाधित विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. (M Tech student gave exam from ICU in Nagpur)

विद्यापीठाच्या पदव्युत्तर एम.ए., एम.एसस्सी. आणि एम.कॉम.च्या प्रथम सत्राच्या परीक्षा ५ ते २० मे दरम्यान महाविद्यालयस्तरावर घ्याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार विविध महाविद्यालयांकडून आजपासून परीक्षा घेण्यास सुरवात झाली. यामध्ये रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयानेही आजपासून परीक्षा घेण्यास सुरवात केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक प्राध्यापक, महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याने अशा भयावह परिस्थितीमध्ये परीक्षा घेऊ नये, किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासाठी आग्रह करू नये अशी मागणी प्राचार्य संघटनांकडून करण्यात आली.

यावर ऑनलाइन परीक्षा असल्याने त्या घेण्यास अडचण नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोरोनाग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुटल्यास मग परीक्षा कशी होईल अशी समस्या समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे कशाही अवस्थेत परीक्षा द्यायची यामुळे परीक्षेचे टेन्शन घेत, परीक्षा देण्याचे ठरविले. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी सामान्य वॉर्डात असलेली एम.टेक.ची मुलगी काल अतिदक्षता (आयसीयू) वॉर्डात दाखल झाली. मात्र, परीक्षा द्यायची असल्याने तीने याही अवस्थेत परीक्षा दिली. केवळ तीने एकटीनेच नव्हे तर बऱ्याच कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांनीही आज परीक्षा दिल्याचे कळते. मात्र, या प्रकाराने विद्यापीठातील प्राधिकरणाचे सदस्य आणि प्राचार्यांकडून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे.

राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य व संबंधित सर्व कर्मचारी वर्गाच्या आरोग्याचा विचार करून सर्व प्रकारच्या परीक्षा विद्यापीठाने जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलाव्या.
-विष्णू चांगदे, सदस्य, व्यवस्थापन परिषद.
कोरोनामुळे प्राध्यापक, प्राचार्य व इतर कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ठिक नाही. सर्व तणावात आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देणे दोन्ही गोष्टी अडचणीच्या आहेत. त्यामुळे सध्यातरी परीक्षा स्थगित कराव्या व परीक्षा अर्ज करण्याच्या मुदतीमध्येही वाढ करावी.
- ॲड. मनमोहन बाजपेयी, सदस्य विधिसभा.

(M Tech student gave exam from ICU in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT