In Madhya Pradesh, Congress relies on Kedar's strategy 
नागपूर

मध्यप्रदेशात काँग्रेसचा केदार यांच्या रणनीतीवर भरवसा

राजेश प्रायकर

नागपूर : मध्यप्रदेशातील मुरैना व ग्वालियर या दोन्ही जिल्‍ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या रणनीतीवर भरवसा दाखवला. केदार यांची मध्यप्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह तर ग्वालियर जिल्ह्यातील ग्वालीयर, ग्वालीयर पूर्व आणि डबरा या विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होणार आहे. केदार या आठ मतदारसंघात कॉंग्रेसचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

केदार यांचे राजकीय कौशल्य जवळून बघणारे माजी केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी या आठही मतदार संघात विजयासाठी त्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. यातील ग्वालियर क्षेत्रात नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे केदार आता ग्वालियरमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना आव्हान देणार आहे.

सुनील केदार यांनी यापूर्वीही बिहार येथील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. एकेकाळी राजकीय कौशल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर केदार यांचे वर्चस्व होते. एवढेच नव्हे मागील निवडणुकीत भाजपने संपूर्ण जिल्ह्यात यश मिळवले. परंतु केदार यांनी प्रतिकूल परिस्थितीत सावनेरचा बालेकिल्ला कायम राखला होता.

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही केदार यांनी विरोधकांना धूळ चारत मंत्रीपदाला गवसणी घातली. आता मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत केदार कोणती रणनिती वापरणार? कॉंग्रेसला विजय मिळवून देणार काय? याकडे राज्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT