पीक विमा योजन eSakal
नागपूर

Crop Insurance: शेतकऱ्यांवर अन्याय होतोय! अवकाळीची नुकसान भरपाई न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम


Anil Deshmukh on Compensation to Farmers:

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हरकरिताचा मुद्धा उपस्थित करून त्यांनी विधानसभेत याकडे सरकारचे लक्ष वेधले.


अवकाळी पावसामुळे कापूस, तूर व संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जेव्हा पंचनामे झाले तेव्हा काटोल व नरखेड तालुक्याचा अहवालात शासनाकडून निरंक दाखवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जर सरकार असे करत असेल तर हा शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. नागपूर जिल्ह्यात कोंढाळी ग्रामीण रुग्णालय आहे. त्याचे अर्धवट काम झाले असून ते पूर्ण करण्यासाठी सात ते आठ कोटींची आवश्यकता आहे.

मागच्या दोन अधिवेशनात मंत्र्यांनी सांगितले होते की, आठ दिवसात पैसे उपलब्ध करून देऊ. पण अद्यापपर्यंत त्यांचे आठ दिवस पूर्ण झालेले नाहीत. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली. अनेक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती तयार आहेत.

पद निर्मिती न झाल्यामुळे तेथे आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत. याठिकाणी पदनिर्मिती करून लवकरात लवकर या इमारती सुरू करण्यात यावेत, अशी मागणी माजी गृह मंत्री आमदार अनिल देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या KYC प्रक्रियेला ब्रेक! पोर्टल संथ, शेतकऱ्यांची सेवा केंद्रांवर गर्दी; पोर्टल स्लोमुळे शेतकरी त्रस्त

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Ayushman Card : मोबाईलवरून घरबसल्या आयुष्मान कार्ड कसे काढायचे? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, वाचा अर्जाची स्टेप-बाय-स्टेप माहिती

Kolhapur Crime: सरकारी नोकरी लावतो, आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक; दोघांना अटक, एक फरार

Latest Marathi News Update : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT