Maharashtra Express canceled for three days railway  sakal
नागपूर

Maharashtra Express : महाराष्ट्र एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील कोपरगाव ते कान्हेगाव स्थानकांदरम्यान प्री/नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील कोपरगाव ते कान्हेगाव स्थानकांदरम्यान प्री/नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणारी कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. यासह अनेक गाड्यांच्या प्रस्थान व गंतव्य ठिकाणात बदल करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ ते २३ जानेवारीदरम्यान रद्द असेल. ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २३ ते २५ जानेवारी दरम्यान धावणार नाही. यासह १२१०१ एलटीटी-शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १३ व १४ जानेवारीला हावडा येथे समाप्त होईल

आणि १२१०२ शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १५ व १६ जानेवारीला हावडा येथून प्रस्थान करणार आहे. १३ व १४ जानेवारीला १२९०६ शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस आणि १२१५२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस हावडा स्थानकावरून प्रस्थान करणार आहे. ११ ते १४ जानेवारी दरम्यान १८०२९ एसटीटी-शलीमार एक्स्प्रेस.संतरागाछी स्थानकापर्यंत धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

SCROLL FOR NEXT