district wise HSC Result 2023
district wise HSC Result 2023 esakal
नागपूर

Maharashtra HSC Result 2023 : विज्ञान शाखा ठरली अव्वल! कला शाखा पुन्हा पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. निकालात नागपूर विभागात यंदाही विज्ञान शाखा अव्वल ठरली असून कला शाखा पिछाडली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.६९ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८२.९३ टक्के लागला आहे.

बारावीच्या निकालात यावर्षी सहा टक्क्यांची घट दिसून आली. त्याचा परिणाम शाखानिहाय निकालावरही पडला. विशेष म्हणजे विज्ञान शाखेत ७२ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. एमसीव्हीसी शाखेच्या निकालात सुधारणा झाल्याचे दिसून आली. या शाखेने दुसऱ्या क्रमांकावर ८७.५१ टक्के निकाल दिला. शाखेत ५ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तिसऱ्या क्रमांकावर वाणिज्य शाखेत ८७.४३ टक्के म्हणजेच १६ हजार ३८४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

कला शाखेच्या निकालातही ११ टक्‍क्‍यांची घसरण दिसून आली असून यावर्षी ८२.९३ टक्के निकाल लागला आहे.

ग्रेडनिहाय विचार केल्यास यावर्षी विभागातील ६ हजार ७४८ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झालेत तर ३२ हजार ४५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ७१ हजार ३६९ दुसऱ्या श्रेणीत तर केवळ २६ हजार ८९४ तिसऱ्या श्रेणीत आले आहेत.

विज्ञान- ९६.६९

वाणिज्य -८७.४३

कला - ८२.७६

एमसीव्हीसी - ८७.५१

आयटी - ७३.४९

प्राविण्य श्रेणी - ६,७४८

पहिल्या श्रेणीतील विद्यार्थी - ३२,४५४

दूसऱ्या श्रेणीतील विद्यार्थी - ७१,३५९

तिसऱ्या श्रेणीतील विद्यार्थी - २६,८९४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT