Dengue malaria patients sakal media
नागपूर

महाराष्ट्रात मच्छरांचं थैमान, मलेरियाचे 19 हजार, तर डेंगीची रुग्णसंख्याही वाढली

राज्यात आढळलेल्या डेंगीच्या रुग्णांमध्ये नागपूर विभाग आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात कोरोनाच्या साथीनेच डेंगी आणि मलेरियाची साथ सुरू होती. परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये इतर साथ आजारांकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होते. राज्यात मलेरियाचे १९ हजार रुग्ण आढळले. तर डेंगीच्या १२ हजार ७२१ रुग्णांची नोंद झाली. राज्यात आढळलेल्या डेंगीच्या रुग्णांमध्ये नागपूर विभाग आघाडीवर आहे. सर्वाधिक ३ हजार ६२८ डेंगीग्रस्त पूर्व विदर्भातील असून २४ मृत्यू झाले आहेत.(Dengue malaria patients)

गतवर्षीच्या तुलनेत ‘डेंगी’ रुग्णांच्या संख्येसह मृत्यू देखील चार पटीने वाढला आहे. २०२० मध्ये राज्यात १० मृत्यू होते, ही संख्या २०२१ मध्ये ४० डेंगीच्या बळींची नोंद झाली. राज्यात वर्ष २०१९ मध्ये डेंगी १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. यापैकी उपचारादरम्यान ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २०२० मध्ये कोरोनाच्या काळात डेंगीची रुग्णसंख्या घटली. त्यावेळी वर्षभरात ३ हजार ३५६ रुग्ण आढळले. यापैकी १० रुग्ण दगावले. परंतु त्यानंतर २०२१ मध्ये राज्यात २०२० च्या तुलनेत चारपट म्हणजे १२ हजार ७२१ रुग्ण आढळले. तर ४० रुग्णांचा बळी डेंगीने घेतला. २०२१ मध्ये आढळलेल्या राज्यातील एकूण रुग्णांपैकी २८.५१ टक्के म्हणजे ३ हजार ६२८ रुग्ण हे नागपूर विभागातील असून एकूण मृत्यूंपैकी तब्बल ६० टक्के म्हणजे २४ मृत्यू हे पूर्व विदर्भातील आहेत.

हत्तीरोगाचे ३७ ८२९ रुग्ण

राज्यात २०१९ मध्ये हिवतापाचे ८ हजार ८६६ रुग्ण आढळळे. यापैकी ७ रुग्ण दगावले. २०२० मध्ये १२ हजार ९०९ रुग्ण आढळले, यापैकी १२ मृत्यू झाले. २०२१ मध्ये १९ हजार २९८ रुग्ण आढळले, यापैकी ८ मृत्यू झाले. चिकनगुणियाचे २०१९ मध्ये १,६४६ रुग्ण, २०२० मध्ये ७८२, २०२१ मध्ये २,४७९ रुग्ण आढळले. यापैकी एकाचाही मृत्यू नाही. हत्तीरोगाचे २०१९ मध्ये ५०,४९३, २०२० मध्ये ४३,१८७, २०२१ मध्ये ३७,८२९ रुग्ण आढळल्याचेही अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाले आले.

राज्यातील डेंगीची स्थिती

  • वर्ष - रुग्ण - मृत्यू

    • २०१९ - १४,८८८ - ४९

    • २०२० - ३,३५६ - १०

    • २०२१ - १२,७२१ - ४०

पूर्व विदर्भातील डेंगीची स्थिती

  • वर्ष - रुग्ण - मृत्यू

    • २०१९ - -१३१६ - ११

    • २०२० - ५०३ - २

    • २०२१ - ३६२८ - २४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT