नागपूर

Deepfake: 'डीपफेक'वर कायदा होणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली माहिती, केंद्रात तयारी सुरु

‘डीपफेक’ हा चिंता वाढवणारा विषय आहे. यामुळे कोणाचीही बदनामी सहज करता येऊ शकते, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis on Deepfake Video: ‘डीपफेक’ हा चिंता वाढवणारा विषय आहे. यामुळे कोणाचीही बदनामी सहज करता येऊ शकते, त्यातून लोकांमध्ये गैरसमजही पसरु शकतात. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे.

केंद्रस्तरावर कायदा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देण्याबाबतच्या नाशिक येथील घटनेची लक्षवेधी सूचनेद्वारे विलास पोतनीस यांनी उपस्थित केला होता.

फडणवीस म्हणाले, सरकार ‘डीपफेक’ मुद्द्यावर गंभीर आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून महिलेने खंडणीच्या रकमेची मागणी केली होती. सदर आरोपीकडून जप्त केलेले व्हिडिओ आणि सापडलेल्या पेनड्राईव्ह सत्यता तपासण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविली आहे असे फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT