maharashtra state teachers association agitation against government in nagpur 
नागपूर

'शिपायाची पदेच भरणार नसेल तर शाळेतील घंटा शिक्षकांनी वाजवायची का?'

राजेश चरपे

नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षकेत्तर कर्मचारी भरती संपविण्याच्या आदेशाची उपसंचालक कार्यालयासमोर होळी करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिपायांची पदे भरणार नसतील तर शिक्षकांनी शाळेतील घंटा वाजवायची आणि स्वच्छता करायची काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

उपरोक्त निर्णय रद्द करण्यासाठी मागणी करीत शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहसंचालक सतीश मेंढे यांच्याद्वारे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. हा आदेश शिक्षण व्यवस्थेला उध्वस्त करणार आहे. अनुदानित शिक्षण व्यवस्थेला बंद करण्याचा कपटी व कुटिल डाव शासनाने आखलेला आहे. यामुळे बेकारी तर वाढणारच आहे तर माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षकांना वर्गाची झाडलोट व्यवस्था तासिका घंटा वाजवायला लावण्याचे कटकारस्थान आखून शासन समाजासमोर शिक्षकांना अपमानीत करीत असल्याचा आरोप योगेश बन यांनी केला. 

हा जाचक निर्णय तत्काळ परत घेतला नाही तर शिक्षक परिषद राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह योगेश बन यांनी यावेळी दिला. या आंदोलनासाठी नागपूर विभागातून मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आणि राज्याचे कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुद्धे यांनी केले. कोषाध्यक्ष नरेश कामडे, प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा रंजना कावळे, कार्यवाह हेमंत बेलखोडे, राजेंद्र पटले, सुभाष गोतमारे, सुधीर वारकर, मनीषा कोलारकर, सुनील पाटील, प्रमोद बोढे, सचिन गिरी राहुल शेंद्रे ,योगराज ढेंगे, श्रीवंत शेंडे, सतीश भारत, दिलीप बमनोटे, मोहम्मद फारुख, सलीम शेख,मोहम्मद फैय्याज, मेघराज फुलके, पुरुषोत्तम चौधरी, रूपेंद्र बसेशंकर, अतुल टेकाडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT