nagpur sakal
नागपूर

Maharashtra Winter Assembly Session : बारा दिवस चालणार अधिवेशनाचे कामकाज!

तारांकित प्रश्नांची सूची चार आठवड्यांची प्रश्नोत्तराची कार्यक्रम पत्रिका निश्चित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार असून १२ दिवस कामकाज चालणार आहे. तर विधिमंडळ सचिवालयाकडून कामकाज एक आठवडा अधिकचे चालण्याचा अंदाज धरत २९ डिसेंबरपर्यंतची तारांकित प्रश्नांची सूची तयार करण्यात येणार आहे.

नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात होते. साधारणतः हिवाळी अधिवेशनच होते. काही वर्ष पावसाळी अधिवेशनही झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात एकदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले. परंतु पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. एक दिवस अधिवेशनाचे कामकाजच बंद ठेवण्याची वेळ आली होती

त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनच घेण्यात येत आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी आहे. परंतु सेंट्रल हॉल नसल्याचे कारण पुढे ते नाकारण्यात आले. करारानुसार अधिवेशन सहा आठवडे चालायला हवे. परंतु दोन किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त अधिवेशन चालले नाही. बोटावर मोजण्याइतक्या वेळाच चार ते सहा आठवडे अधिवेशन चालले असेल. यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नेहमीच विरोधात असणाऱ्या पक्षांकडून अधिवेशन तीन, चार आठवडे चालवण्याची मागणी होते. परंतु सत्ताधाऱ्यांकडून ती अमान्य होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिवेशन २२ तारखेपर्यंत चालणार आहे. शनिवार, रविवारला कामकाज बंद राहत असल्याने प्रत्यक्षात १२ दिवसांचे कामकाज होईल. विधिमंडळ सचिवालयाकडून मात्र एक आठवडा अतिरिक्त कामकाजाची तयारी करण्यात येणार आहे. तारांकित प्रश्न हे ३० नोव्हेंबरपासून स्वीकारण्यात येणार असून २९ डिसेंबरपर्यंतची तारांकित प्रश्नांची सूची तयार करण्यात येणार आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून यासंदर्भातील पत्रकही जारी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT