State President of Congress Nana Patole esakal
नागपूर

Nana Patole : विधानसभा निवडणुकीबाबत नाना पटोलेंची मोठी घोषणा; म्हणाले, 'मविआ'च्या नावावर आम्ही..

मोदी सरकार हे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही.

नागपूर : काँग्रेस पक्ष (Congress Party) संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक चर्चा केली आहे. ज्या जागा काँग्रेसला सुटतील त्यावर आम्ही ताकदीने लढणार आहोत, असे सांगून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या नावावर विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना क्लिनचीट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून आणखी एकाला स्वच्छ करून घेतल्याने आणखी एक उदाहरण आहे. मोदी सरकार हे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अपवादात्मक स्थितीत अशी एखादीच घटना आपण समजू शकतो, पण अशी अनेक उदाहरणे घडत आहेत, वायकर त्यातीलच एक प्रकरण आहे.

लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना ‘क्लिन चीट’ देऊन फाइल बंद केली. यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे पटोले म्हणाले. एकनाथ शिंदे हे मूठभर लोकांना मदत करणारे मुख्यमंत्री आहेत. खरी मॅच आता सुरु होणार असून त्यात जनता उत्तर देणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आनंद क्षणभंगूर आहे. त्यांचा झेल जनताच घेणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. राज्याचे गृहमंत्री हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आरोपींना पंचतारांकित सुविधा दिली जाते. नागपूरमध्येही मद्यधुंद महिला कारचालकाने दोन तरुणांना कारखाली चिरडले. ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आरोपींना जामीन मिळाला. धनाढ्य घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याच्या प्रयत्न करण्याची हिंमत होते, असे पटोले म्हणाले.

दीक्षाभूमीशी लोकांच्या भावना जुळलेल्या

दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही. हे सरकार दीक्षाभूमीत काही चांगले करेल यावर लोकांचा विश्वासच नाही, म्हणून तो जनक्षोभ दिसून आला, असेही पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT